महामार्गावरील उभ्या वाहनावर कारवाई करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:26 AM2021-03-21T04:26:50+5:302021-03-21T04:26:50+5:30

रस्त्यावर वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीस अडचण निर्माण होत असून अपघात घडत आहे. सदर महामार्गावर अवैधरीत्या वाहने ...

Demand for action on a vertical vehicle on the highway | महामार्गावरील उभ्या वाहनावर कारवाई करण्याची मागणी

महामार्गावरील उभ्या वाहनावर कारवाई करण्याची मागणी

Next

रस्त्यावर वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीस अडचण निर्माण होत असून अपघात घडत आहे. सदर महामार्गावर अवैधरीत्या वाहने उभ्या ठेवणाऱ्या वाहन चालक,मालकावर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

चंद्रपूर आदिलाबाद घुग्घुसकडून वणी यवतमाळकडे जडवाहनाबरोबर चारचाकी, दुचाकी वाहनांची रात्रंदिवस वर्दळ सुरू असते. अश्यातच शेणगाव फाटा ते घुग्घुस -वणी महामार्गावर ठिकठिकाणी वाहने उभे ठेवण्यात येत आहे. त्यामुळे नेहमी अपघात घडत आहे. सदर मार्गाच्या दोन्ही बाजूनी जड वाहने उभी ठेवत असल्याने वाहतुकीला अडथळे होत आहे.तर नेहमी उभ्या ट्रकच्या चालकासोबत नागरिकांची तू तू मै मै होत असते. रस्त्यावर विविध ट्रान्स्पोर्टरचे कार्यालय,वर्कशॉप असून एकेरी वाहतुकीचे उल्लंघन होत असते. रस्त्यावर त्या त्या ट्रान्स्पोर्टरची वाहने (ट्रक) उभे ठेवत आहे. या गंभीर समस्येकडे नागरिकांनी पोलीस विभागाचे वारंवार लक्ष वेधले असले तरी या तक्रारीची दखल वाहतूक पोलिसाकडून घेतली जात नाही.

चंद्रपूर रस्त्यावरील प्रियदर्शनी, बियाणी शाळेपासून तर घुग्घुस वणी मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक ते राजीव रतन चिकित्सालय ते वर्धा नदी एसएसटी पाइंट पुलापर्यत रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात यावी. जेणेकरून वाहतुकीला अडथडा निर्माण होऊ नये. अशी मागणी पोलीस विभागाकडे करण्यात आली आहे.

Web Title: Demand for action on a vertical vehicle on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.