सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:19 AM2021-07-02T04:19:47+5:302021-07-02T04:19:47+5:30
अकोलातील विद्यापीठाचे विभाजन करा : पालकमंत्र्यांना दिले निवेदन सिंदेवाही : सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ स्थापन करावे, अशा मागणीचे निवेदन ...
अकोलातील विद्यापीठाचे विभाजन करा : पालकमंत्र्यांना दिले निवेदन
सिंदेवाही : सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ स्थापन करावे, अशा मागणीचे निवेदन शहरातील तालुका विकास संघर्ष समिती सिंदेवाही यांच्या वतीने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना दिले.
सिंदेवाही हे तालुक्याचे ठिकाण आहे. विदर्भातील प्रगतशील शेतकऱ्यांकरिता एकमेव कृषी विद्यापीठ अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठ आहे. कृषी विद्यापीठाचे विभाजन रखडले आहे. सिंदेवाही येथील केंद्रबिंदू असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाण आहे. पूर्व विदर्भाकरिता एकमेव असलेल्या विद्यापीठाचे विभाजन करून स्वतंत्र कृषी विद्यापीठ निर्माण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. सिंदेवाहीकर तालुका मुख्यालयात नवीन विद्यापीठ स्थापन करण्याकरिता आग्रही झाले होते. मात्र प्रस्ताव थंडबस्त्यात पडला आहे. राज्यातील अनेक विद्यापीठांचे विभाजन करून प्रशासकीय बाब म्हणून नवे विद्यापीठ निर्माण केले जात आहे. विदर्भातील अकोला येथे असलेले डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संपूर्ण विदर्भातील एकमेव विद्यापीठ आहे. त्यामुळे या कृषी विद्यापीठाचे विभाजन करून सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी तालुका विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रफुल तुम्मे, दीपक डेंगानी, अनुप श्रीरामवार, हरिभाऊ पाथोडे, अशोक निले, संदीप बांगडे, तुळशीदास तुम्मे, मयूर सुचक, रितेश घुमे उपस्थित होते.