विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:50 AM2019-06-16T00:50:54+5:302019-06-16T00:52:08+5:30
मागील अनेक वर्षांपासून ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्या नियुक्त्या त्वरीत करण्याची मागणीचे निवेदन रिपब्लिकन कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष इंजि. तथागत पेटकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महावितरणचे अधीक्षक अभियंता म्हस्के यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील अनेक वर्षांपासून ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्या नियुक्त्या त्वरीत करण्याची मागणीचे निवेदन रिपब्लिकन कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष इंजि. तथागत पेटकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महावितरणचे अधीक्षक अभियंता म्हस्के यांना दिले.
ग्रामीण भागातील विजेचा लंपडाव थांबावा, या दृष्टीने प्रत्येक ठिकाणी ग्राम विद्युत सेवकांची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार गावातील आयटीआय उत्तीर्ण युवकाची निवड करण्यात येणार होती. त्यानुसार ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या प्रशिक्षणाचे कार्य नागपूरच्या कंपनीला निविदेद्वारे देण्यात आले आहे. मात्र प्रशिक्षणाचे कार्य अद्यापही सुरू झालेले नाही. याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असताना दिरंगाईमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास ५६५ गावातील ग्राम विद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्त्या रखडल्या आहे. त्यामुळे महावितरणने मुलांच्या प्रशिक्षणाचे कार्य जुलै महिन्याचा पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू करावे, अन्यथा रिपब्लिकन कामगार सेनतर्फे आंदोलन करण्याचा इशारा दिला.
यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता म्हस्के यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून संपूर्ण कामाविषयी माहिती घेऊन, ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या प्रशिक्षणाचे काम ज्या कंपनीला दिले आहे. त्या कंपनीकडून त्वरीत करावे, अशा सुचना दिल्या.
निवेदन देताना रिपब्लिकन कामगार सेनेचे शेखर गव्हारे, विनोद कांबळे आदी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.