पुरबुडित शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:29 AM2021-04-07T04:29:42+5:302021-04-07T04:29:42+5:30
ब्रह्मपुरी : सप्टेंबर २०२० मध्ये गोसेखुर्द धरणाचे दरवाजे खुले केल्याने बरडकिन्ही येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचा पंचनामाही करण्यात ...
ब्रह्मपुरी : सप्टेंबर २०२० मध्ये गोसेखुर्द धरणाचे दरवाजे खुले केल्याने बरडकिन्ही येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचा पंचनामाही करण्यात आला. मात्र अद्यापही कुठल्याही प्रकरची मदत देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्यात यावी, अशी मागणी कृतिसंसाधन समितीच्या शिष्टमंडळांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने बरडकिन्ही येथे मोठ्या प्रमाणात पूर आला. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने वेळीच दखल घेत पुरबुडितांना मदत जाहीर केली. काही शेतकऱ्यांना मदतीचे वितरणही करण्यात आले. मात्र बरकिन्ही येथील बहुतांश शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्यात यावी, अशी मागणी कृतिसंसाधन समितीतर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी पंचनामा पात्र शेतकऱ्यांची यादीही देण्यात आली. यावेळी यशवंतराव खोब्रागडे, भाऊराव मेश्राम, आनंद रामटेके आदी उपस्थित होते.