जप्त वाहनांचा लिलाव करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:29 AM2021-08-15T04:29:23+5:302021-08-15T04:29:23+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात रेतीघाटांचा लिलाव झाला नसल्यामुळे मागील काही महिन्यापासून महसूल तसेच अन्य विभागाने घाटावर धाड टाकून मोठ्या प्रमाणात ...
चंद्रपूर : जिल्ह्यात रेतीघाटांचा लिलाव झाला नसल्यामुळे मागील काही महिन्यापासून महसूल तसेच अन्य विभागाने घाटावर धाड टाकून मोठ्या प्रमाणात रेती तसेच वाहने जप्त केली आहेत.
जप्त करण्यात आलेली वाहने शासकीय कार्यालयामध्ये ठेवण्यात आली आहेत. मात्र संबंधित मालकांनी आकारण्यात आलेला दंड न भरल्यामुळे वाहने तिथेच आहेत. त्यामुळे या वाहनांचा लिलाव करून जागा मोकळी करावी, अशी मागणी सामाजिक संस्थांनी केली आहे. विशेष म्हणजे, येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये रेतीचा मोठा साठा असून, हा साठा गरजूंना द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच पोलीस विभागाने अवैध दारू विक्रीच्या केलेल्या कारवाईत अनेक वाहने जप्त केली होती. ती वाहनेसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये धूळ खात पडली आहेत. अनेक वाहनांचे साहित्य बिनकामी होत आहे. त्यामुळे या वाहनांचासुद्धा लिलाव करावा, अशी मागणी आहे.