मूल येथे ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:28 AM2021-04-22T04:28:38+5:302021-04-22T04:28:38+5:30
मूल : तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूच्या प्रमाणातही होत असलेली वाढ ही पुढे रौद्ररूप धारण करू नये. ...
मूल : तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूच्या प्रमाणातही होत असलेली वाढ ही पुढे रौद्ररूप धारण करू नये. मूल तालुक्यातील कोरोना रुग्णांना त्वरित बेड उपलब्ध व्हावे, याकरिता तालुक्याच्या ठिकाणी कोविड-१९ सेंटर देऊन ऑक्सिजन आणि डॉक्टर, नर्स, कर्मचारी त्वरित उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी मूल तालुका काॅंग्रेस कमिटीच्या वतीने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा जि. प. माजी अध्यक्ष संतोष रावत यांच्या नेतृत्वात या संदर्भातील निवेदन देण्यात आले. यावेळी ना. वडेट्टीवार यांनी मूल येथे तत्काळ ऑक्सिजन जनरेशन प्लांटला मंजुरी प्रदान केली असल्याचे पत्र यावेळी काॅंग्रेस कमिटीला दिले आहे. त्यामुळे मूल तालुक्यातील जनतेला फार मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी तालुका काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक राकेश रत्नावार उपस्थित होते.