निमघाट परिसरात बॅरेजची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:35 AM2021-02-25T04:35:38+5:302021-02-25T04:35:38+5:30
याद्वारे नदीकाठावरील अनेक शेतकऱ्यांना विविध पिकांचे उत्पादन घेता येणार असल्याने त्यांना या योजनेचा मोठा लाभ होणार आहे. दरवर्षी ...
याद्वारे नदीकाठावरील अनेक शेतकऱ्यांना विविध पिकांचे उत्पादन घेता येणार असल्याने त्यांना या योजनेचा मोठा लाभ होणार आहे. दरवर्षी ऐन हंगामात या परिसरातील पिके पाण्याअभावी करपून जातात. त्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होते. बॅरेजचे बांधकाम केल्यास परिसरातील पिकांना वाचविता येणार असून, शेकडो एकर शेती बारमाही सिंचनाखाली येणार आहे. तर बॅरेजच्या बांधकामामुळे नदीपात्रातील जलस्तरात वाढ होऊन राजोली, पेटगाव, येथील नळ योजनांना बळकटी येऊन दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्याचे जाणवणारे दुर्भिक्ष कायमचे नाहीसे होणार आहे. त्यामुळे उमा नदीवर बॅरेजचे बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे.
परिसरातील लगतच्या शेतशिवारातून लहान-मोठे अनेक ओढे, नाले प्रवाहित आहेत. नदीपात्रातील निमघाटाजवळ हे सर्व लहान-मोठे ओढे, नाले उमा नदीला येऊन मिळतात. येथे बॅरेजचे बांधकाम झाल्यास याचा उपयोग पाटीचारीसारखा करता येऊन शेतांना सर्वदूर पाणी वाहून नेण्यासाठी करता येईल.
यासाठी उमा नदीच्या निमघाट परिसरात बॅरेजचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांद्वारे करण्यात येत आहे.