फायर वॉचरला पेंशन योजनेचा लाभ देण्याची मागणी

By admin | Published: June 19, 2014 11:46 PM2014-06-19T23:46:32+5:302014-06-19T23:46:32+5:30

वनविकास महामंडळअंतर्गत काम करणाऱ्या फायरवाचरची बैठक चरणदास मुंजनकर यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रमेशचंद्र दहिवडे उपस्थित होते.

The demand for the benefit of the pension scheme of Fire Watch | फायर वॉचरला पेंशन योजनेचा लाभ देण्याची मागणी

फायर वॉचरला पेंशन योजनेचा लाभ देण्याची मागणी

Next

चंद्रपूर : वनविकास महामंडळअंतर्गत काम करणाऱ्या फायरवाचरची बैठक चरणदास मुंजनकर यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रमेशचंद्र दहिवडे उपस्थित होते.
या बैठकीत तलांडे म्हणाले, गेल्या २५ वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळापासून जंगलाला लागलेली आग विझविण्याचे काम आम्ही सतत करीत आहाते. फायर वॉचर म्हणून आम्हाला चार महिने काम मिळते. अन्य दिवसांत वनविकास महामंडळाअंतर्गत होणाऱ्या कामात आम्हाला प्राधान्याने घेऊन जगण्याचा अधिकार दिला पाहिजे. प्रा. दहिवडे म्हणाले, फायरवॉचरला १९९७ पासून प्राव्हीडंट फंंड योजनेचा लाभ देण्यात आला. दहा वर्षे प्राव्हीडंट फंंड योजनेचा सदृश्य व पन्नास वर्षे पूर्ण झाले अशांना प्राव्हडंट फंड योजनेअंतर्गत पेंशन योजना लाभ दिल्या जातो.
मात्र तो लाभ फायरवॉचरला दिल्या गेला नाही. जे सेवानिवृत्त झालेत, त्यांंना पेंशन योजनेचा लाभ देण्यात यावा, ही मागणी बैठक मध्ये करण्यात आली.
मुंजनकर म्हणाले, फायरवॉचरच्या प्रश्नाला घेऊन ७ जुलैला प्रादेशिक व्यवस्थापन यांच्या कार्यालयासमोर धरणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा.दहिवडे यांच्या नेतृत्त्वात धरणे कार्यक्रमात प्रादेशिक व्यवस्थापक यांचे कार्यालयासमोर दुपारी १२ वाजेपर्यंत उपस्थित राहावे, अशी विनंती मुंजनकर यांनी केली. आभार तुळशिराम शेडमाके यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: The demand for the benefit of the pension scheme of Fire Watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.