ऑनलाईन शिक्षणाची वेळ बदलविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:18 AM2021-06-30T04:18:33+5:302021-06-30T04:18:33+5:30

शिक्षण मंत्र्यांना निवेदन सादर चिमूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑनलाईन पद्धतीने विद्याज्ञानाचे काम सुरू आहे. प्रत्यक्ष शाळा, कॉलेज भरत ...

Demand to change the timing of online learning | ऑनलाईन शिक्षणाची वेळ बदलविण्याची मागणी

ऑनलाईन शिक्षणाची वेळ बदलविण्याची मागणी

Next

शिक्षण मंत्र्यांना निवेदन सादर

चिमूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑनलाईन पद्धतीने विद्याज्ञानाचे काम सुरू आहे. प्रत्यक्ष शाळा, कॉलेज भरत नसल्याने विद्यार्थी मोबाईल किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून ज्ञानार्जन करीत आहेत. ग्रामीण भागात बरेचसे पालक हे मोलमजुरी, शेतीची कामे करतात. त्यामुळे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल उपलब्ध होत नाही. काही प्रमाणात शहरांमध्येही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाची वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ करण्याची मागणी शिक्षक भारतीने शिक्षणमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

गरीब, वंचित व कोरोनामुळे रोजगार गमावलेल्या पालकांना इंटरनेट पॅक मारण्यासाठी प्रती विद्यार्थी रिचार्ज किंवा भत्ता देण्याबाबत निर्णय घेण्यात यावा, या आशयाचे पत्र आमदार कपिल पाटील यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठविले आहे, अशी माहिती शिक्षक भारती नागपूर विभाग सरचिटणीस तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरेश डांगे, विभागीय उपाध्यक्ष रवींद्र उरकुडे, जिल्हा कार्याध्यक्ष जब्बार शेख, सरचिटणीस नंदकिशोर शेरकी, संघटक विलास फलके, उपाध्यक्ष वीरेनकुमार खोब्रागडे, राजेश धोंगडे, माध्यमिक विभागाचे भास्कर बावनकर, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम टोंगे, कार्यवाह राकेश पायताडे, प्रशांत सुरपाम, सतीश डांगे, प्रवीण पिसे आदींनी दिली आहे.

Web Title: Demand to change the timing of online learning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.