शेतकºयांना नुकसानभरपाई देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 11:36 PM2017-09-22T23:36:26+5:302017-09-22T23:36:39+5:30
अवकाळी पावसामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. त्यांची भरपाई देण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अवकाळी पावसामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. त्यांची भरपाई देण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.
१७ सप्टेंबरला रात्री आलेल्या अवकाळी वादळी पावसाने परिसरातील शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. त्यात चंद्रपूर, भद्रावती, ताडाळी, साखरवाही, मुरसा, शेणगाव, सोनेगाव, येरुर, घोडपेठ, चपराळा, गुंजाळा, गोरज, निंबाळा या गावातील उभ्या पिकांना मोठा फटका बसला. कपाशीचे पीक पूर्णत: कोलमडले. बºयाच ठिकाणी पाणी साचल्याने पिके बुडाली. ऐन भरात असलेल्या पिकांचे नुकसान झाले. आधीच शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यातच वादळी पावसाने आर्थिक संकटात सापडला आहे. परिसरातील गावातील मोका तपासणी करुन शेतकºयांना न्याय मिळवून देण्याची मागणी निवेदनातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, मेंढे रोशन पचारे, नीरज बोंडे यांनी केली आहे.