परसोडा येथे पुलाच्या निर्मितीची मागणी
By admin | Published: October 1, 2015 01:22 AM2015-10-01T01:22:41+5:302015-10-01T01:22:41+5:30
तालुक्यातील परसोडा फाटा ते परसोडा गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.
कोरपना: तालुक्यातील परसोडा फाटा ते परसोडा गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.
पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास नाल्याला पूर येतो. परिणामी हा मार्ग पूर्णपणे बंद होतो. परिणामी गावाचाही संपर्क तुटतो. सद्यस्थितीत पुलाची उंची वाढवून ही समस्या दूर करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव पेचे यांनी केली आहे. तालुक्यातील परसोडा हे महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील शेवटचे गाव आहे. येथील नागरिकांचा दैनंदिन संपर्क तालुक्याचे मुख्यालय असलेल्या कोरपनाशी येतो. परिसरातील हीच मोठी बाजारपेठ असल्याने त्यांना जाणे-येणे याच मार्गाने करावे लागते. मात्र पावसाळ्यात या पुलामुळे संपर्क तुटत नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यापूर्वी पुलासंदर्भात अनेकदा निवेदने देण्यात आली. मात्र या निवेदनांना आजवर केराचीच टोपली दाखवण्यात आली. आतातरी या पुलाच्या निर्मितीसंदर्भात त्वरित पावले उचलावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. याच मार्गावर परसोडा, परसोडा गुडा, अशी तीन ते चार गावे आहेत.