वाहनपरवाना शिबिर घेण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:29 AM2021-02-16T04:29:14+5:302021-02-16T04:29:14+5:30
वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्याची मागणी चंद्रपूर : जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. ...
वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी असणे गरजेचे आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. कोरोना काळामध्ये काही रुग्णालयांना अद्ययावत करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र अजूनही रिक्त पदे भरण्यात आलीच नाही.
अवैध वाहतूक वाढली
राजुरा : तालुक्यातील वेकोलिच्या औद्योगिक परिसरात मोठ्या प्रमाणात सुखसुविधा उपलब्ध आहे. मात्र बसअभावी विद्यार्थ्यांना अवैध प्रवासी वाहतुकीचा अवलंब करावा लागत आहे. विद्यार्थ्यांकरिता शासनाच्या असलेल्या सोईसुविधा निकामी ठरल्या आहेत. या संधीचा फायदा घेत अवैध वाहतुकीने डोके वर काढले आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
वेगवान वाहनांवर कारवाई करा
चंद्रपूर : स्पर्धात्मक युगात अल्पवयीन मुले दुचाकीवर स्वार होऊन सुसाट वेगाने दुचाकी चालवितात. त्यांच्याजवळ दुचाकी चालविण्याचा परवानाही नसतो. त्यामुळे अपघाताच्या घटनेमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यावर आळा घालून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी चंद्रपूर शहरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
डास प्रतिबंधक फवारणी करण्याची मागणी
चंद्रपूर : शहरातील अनेक वॉर्डात नाल्यांची साफसफाई न झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. महानगर पालिकेकडून काही वॉर्डात फवारणी करण्यात आली. त्यानंतर ही कामे बंद आहेत. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन फवारणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त
चंद्रपूर : जयंत टॉकीज ते जटपुरा गेटपर्यंत नागरिकांना पायदळ चालण्यासाठी दोन्ही बाजूने फुटपाथ तयार करण्यात आले. मात्र या फुटपाथवर अतिक्रमण करण्यात आल्याने पायदळ जाणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रेतीघाटाच्या लिलावाची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या रेतीची चोरी होत आहे. या चोरीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने तालुक्यातील सर्वच रेती घाटाचे लिलाव करावेत, अशी मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे.