मौशी वीज उपकेंद्र मंजुरीसाठी ऊर्जामंत्र्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 11:52 PM2017-10-12T23:52:21+5:302017-10-12T23:52:51+5:30
नागभीड तालुक्यातील १० ते १२ गावांसाठी मौशी येथे ३२ केव्ही वीज उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी आ. कीर्ती भांगडिया यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील १० ते १२ गावांसाठी मौशी येथे ३२ केव्ही वीज उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी आ. कीर्ती भांगडिया यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे.
नागभीड तालुक्यातील मौशी हे गाव ब्रह्मपुरी वीज मंडळातंर्गत येत असून या परिसरामध्ये बहुसंख्य शेतकरी वर्ग आहे. मात्र, सध्या या परिसरात भारनियमन सुरू असल्यामुळे शेतपिकांना पाणी देणे शेतकºयांना अडचणीचे जात आहे. या परिसरात वीज समस्या नेहमीच उद्भवत असते. त्यामुळे १० ते १२ गावातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मौशी येथे ३२ केव्ही स्वतंत्र विद्युत उपकेंद्र मंजूर झाल्यास परिसरातील वीज समस्या सुटू शकते, असे भांगडिया यांनी म्हटले आहे.
भविष्यात मौशी परिसराला गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी मिळणार असल्याने मौशी येथे निर्माण होणाºया ३२ केव्ही उपकेंद्राद्वारे विजेची समस्या सुटून ग्रामीण कुटीर उद्योगांना चालना मिळू शकते. त्यामुळे मौशी येथे वीज उपकेंद्र स्थापन करण्यासाठी राज्य शासनाकडून उपाययोजना करण्याची मागणी आ. भांगडिया यांनी केली आहे.