पोलीस पाटलांची पदे भरण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:33 AM2021-09-15T04:33:14+5:302021-09-15T04:33:14+5:30
ट्रकचालकांच्या वेगावर नियंत्रण आणा चंद्रपूर : येथील पडोली परिसरात कोळसा, राख, रेती व अन्य साहित्याची वाहतूक करणारे अनेक ट्रक ...
ट्रकचालकांच्या वेगावर नियंत्रण आणा
चंद्रपूर : येथील पडोली परिसरात कोळसा, राख, रेती व अन्य साहित्याची वाहतूक करणारे अनेक ट्रक जात असतात. पण, या ट्रकचे चालक भरधाव वेगाने ट्रक चालवत असून रस्त्याच्या वळणावरही वाहनांचा वेग कमी करत नाहीत. त्यामुळे अनेक अपघात होत असतात़ या ट्रकच्या वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे.
जड वाहनांना बंदी घालावी
चंद्रपूर : येथील बिनबागेटमार्गे रामनगर चौकात जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या संख्येने जड वाहने जातात. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहरातील भूखंड दुर्लक्षित
चंद्रपूर : शहरातील अनेक ले-आऊटमधील मोकळे सोडण्यात आलेले भूखंड दुर्लक्षित आहेत. विविध सामाजिक उपक्रमांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या या भूखंडांचा कोणताही उपयोग होताना दिसत नाही. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी महापालिकेने अस्वच्छतेमुळे खासगी भूखंड धारकांवर दंड ठोठावला होता. त्यामुळे महापालिकेने शहरातील मोकळे भूखंड विकसित करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
चंद्रपूर कृऊबामध्ये अस्वच्छता
चंद्रपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये सर्वत्र अस्वच्छता आहे. भाजीपाला आणि इतर केरकचरा परिसरातच टाकण्यात येत असल्याने दुर्गंधी येत असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बाजार समितीच्या प्रशासनाने याकडे लक्ष देऊन उपाययोजना करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
वर्दळीच्या मार्गावर वाहने सुसाट
चंद्रपूर : स्पर्धात्मक युगात अल्पवयीन मुले दुचाकीवर स्वार होऊन सुसाट वेगाने दुचाकी चालवितात. त्यामुळे अपघात होत आहेत. शहरातील वर्दळीच्या मुख्य मार्गावर भरधाव वेगाने वाहन चालविली जातात. त्यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागते. त्यांच्यावर कारवाई करावी.