गरिबांना मोफत गॅस सिलिंडर देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:20 AM2021-06-03T04:20:33+5:302021-06-03T04:20:33+5:30
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी संचासरबंदी व लॉकडाऊन करण्यात आले. अनेकजण बेरोजगार झाले. छोटेमोठे व्यवसाय करणाऱ्यांना फटका बसला. ...
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी संचासरबंदी व लॉकडाऊन करण्यात आले. अनेकजण बेरोजगार झाले. छोटेमोठे व्यवसाय करणाऱ्यांना फटका बसला. ज्याचे उत्पन्न दीड लाखांच्या आत आहे. अशा लोकांना मोफत अन्नधान्व व गॅस सिलिंडकर देण्याची मागणी करण्यात आली आहे.
बाॅक्स
आर्थिक मदत करण्याची मागणी
चंद्रपूर : वाजंत्री व बँड वाजविणाऱ्यांचा व्यवसाय लॉकडाऊनमुळे ठप्प झाला आहे. या व्यवसायावर जगणाऱ्यांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात लग्न व अन्य समारंभ होतात. या ठिकाणी वाजंत्र्यांची मागणी असते. परंतु लॉकडाऊनमुळे लग्न व अन्य समारंभ थाटात होणे बंद झाले आहे. परिणामी त्यांचा व्यवसाय बंद झाला आहे.
---
आरटीईचा परतावा प्रलंबित
चंद्रपूर : आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशाची योजना गेल्या अनेक वर्षांपासून राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. मात्र तब्बल दोन वर्षाचे शाळांचे आरटीई प्रवेशाचे अनुदान प्रलंबित असल्याने विना अनुदानित शाळांची कोंडी होत आहे.
आरटीई अंतर्गत इयत्ता पहिलीत विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश दिले जातात. या प्रवेशाची प्रतिपूर्ती शासन संबंधित शाळांना करीत असते. मात्र शासनाची उदासीनता व प्रशासकीय दिरंगाईमुळे अनुदान प्रलंबित आहे. परिणामी संबंधित शाळेच्या संस्थेला व मुख्याध्यापकांना शाळा चालविण्यासाठी आर्थिक अडचणी येत आहेत.