कोरपना येथे गॅस एजन्सीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:30 AM2021-09-26T04:30:36+5:302021-09-26T04:30:36+5:30
शाळेची धुरा आता स्थानिक समितीवर नागभीड : शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन असला तरी या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी ...
शाळेची धुरा आता स्थानिक समितीवर
नागभीड : शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन असला तरी या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी स्थानिक समितीवर सोपविण्यात आली आहे. ग्रामपंचायत स्तरावर समिती गठित करून शासनाकडून सुचविण्यात आलेल्या काही मुद्द्यांवर चर्चा करूनच शाळा सुरू कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
परवाना शिबिराची गरज
सावली : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. वाहतूक विषयाचे कुठलेही ज्ञान व नियम अवगत नसलेले तरुण ट्रॅक्टर चालवितात. ट्रॅक्टर उलटून आजवर जिल्ह्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टरचालकांसाठी परवाना शिबिर भरविण्याची गरज आहे.
वराेरा येथे पदव्युत्तर महाविद्यालयाचा अभाव
चंद्रपूर : जिल्ह्यात शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या वरोरा शहरात एकही पदव्युत्तर महाविद्यालय नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना भद्रावती किंवा चंद्रपूर येथे जाऊन आपले पुढील शिक्षण पूर्ण करावे लागते.
बसस्थानक नसल्याने गैरसोय
चंद्रपूर : जिल्ह्यातील जिवती, कोरपना, पोंभूर्णा, गडचांदूर, भिसी, माजरी, नवरगाव, दुर्गापूर, विसापूर, कोठारी या महत्त्वपूर्ण ठिकाणी सुसज्ज बसस्थानक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
रेल्वेमार्गाची नागरिकांची मागणी
मूल : येथून गडचिरोलीसाठी नवीन रेल्वेमार्ग तयार करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. हा रेल्वेमार्ग झाल्यास गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यासोबत रेल्वेमार्गाने जोडले जाईल. पर्यायाने येथील बाजारपेठेला चालना मिळेल, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
ग्रामीण भागात जनजागृती करावी
चंद्रपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये शासनाने वैयक्तिक शौचालय बांधून दिले आहे. असे असतानाही आजही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही नागरिक शौचालयाचा वापर न करताच बाहेर जात आहे. त्यामुळे जनजागृती करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात वाढीव टाकीचा अभाव
वरोरा : शहराचा विस्तार वाढत आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आणखी एका पाणी टाकीचे बांधकाम करण्याची गरज आहे. नगरपंचायतीने याबाबत हालचाली कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वरोरा शहरातील काही वॉर्डांना अतिशय कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय अनेक नागरिक नळाला टिल्लूपंप लावत असल्याने काही भागांतील लोकांना अपुरे पाणी मिळत आहे.
कर्मचाऱ्यांना संगणक प्रशिक्षण द्या
चंद्रपूर : ऑनलाइन वेतन देयक तयार करण्यासाठी इंटरनेटसह संगणकाचे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. मात्र, अनेक शाळांमधील शिक्षक, लिपिकांना संगणकाचे परिपूर्ण ज्ञान नाही.