पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयातील पदभरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:35 AM2021-07-07T04:35:07+5:302021-07-07T04:35:07+5:30
सद्य:स्थितीत पावसाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात कीटक व डासांची उत्पत्ती वाढीस असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
सद्य:स्थितीत पावसाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात कीटक व डासांची उत्पत्ती वाढीस असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे १५ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना पुरविल्या जाणाऱ्या फॉगिंग मशीन पुरविण्याबाबत जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीची नावे निश्चित केलेली असल्याने लवकरात लवकर पुरवठा करण्याबाबत निर्देश देण्याची विनंतीसुद्धा केलेली आहे. यासोबतच जिल्हा परिषद अध्यक्षांना पत्राद्वारे जि. प. प्राथमिक शाळा सातारा कोमटी येथे वॉटर आरओ मशीन, उमरी पोतदार व पोंभुर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रात ब्लड प्रेशर मॉनिटर, आंबेधानोरा नवीन इमारतीमधील अंगणवाडी केंद्राला सोलार सिस्टीम, सातारा कोमटी प्राथमिक शाळेच्या मागच्या बाजूला व वस्तीत सोलार हायमास्ट बसविणे, ग्रामपंचायत सातारा भोसलेअंतर्गत येत असलेल्या सातारा तुकुम येथील वीर बाबूराव चौकाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याची मागणी त्यांनी केली आहे.