दंडाची रक्कम घेऊन ट्रॅक्टर मालकाच्या सुपुर्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:20 AM2021-06-17T04:20:16+5:302021-06-17T04:20:16+5:30

मागील वर्षी या परिसरातील वर्धा नदीच्या विविध घाटावरून अवैध रेती उत्खनन करताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे ३० ट्रॅक्टर पकडले ...

Demand for handing over of the fine to the tractor owner | दंडाची रक्कम घेऊन ट्रॅक्टर मालकाच्या सुपुर्द करण्याची मागणी

दंडाची रक्कम घेऊन ट्रॅक्टर मालकाच्या सुपुर्द करण्याची मागणी

Next

मागील वर्षी या परिसरातील वर्धा नदीच्या विविध घाटावरून अवैध रेती उत्खनन करताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे ३० ट्रॅक्टर पकडले आणि घुग्घुसच्या नायब तहसीलदार कार्यालयात उभे केले तर काही ट्रॅक्टर पोलीस ठाणे परिसरात अनेक महिन्यांपासून उभे आहेत. ट्रॅक्टर जागेवर उभे असल्याने ट्रॅक्टर खराब होत आहे.

शासनाच्या नियमानुसार एक लाख १० हजार ९०० रुपये दंड भरून काहींनी ट्रॅक्टर सोडविले; तर काहींनी दंड भरूनसुद्धा प्रशासनाने ट्रॅक्टर सोडले नाहीत. ट्रॅक्टरमालकांनी दंड भरण्यासाठी रकमेची जुळवाजुळव केली. मात्र दंड भरून ट्रॅक्टर सोडले नसल्याने दंड भरूनही ट्रॅक्टर मिळेल की नाही, असा संभ्रमात ट्रॅक्टरमालक आहेत.

यावेळी पत्रकार परिषेदेला हितेश लोढे, विलास रामटेके, मुन्ना जुल्फेकर अहमद, खलील अहमद, नत्थू घोडके, पिंटू लोढे, आनंद मिश्रा, प्रल्हाद घोडके, नभी शेख, शमुद्दीन शेख, मोसीन खान, अंकुश ठाकरे, अशोक घोडके उपस्थित होते.

Web Title: Demand for handing over of the fine to the tractor owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.