लहान मुलांचे लसीकरण करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:30 AM2021-09-25T04:30:06+5:302021-09-25T04:30:06+5:30
ग्रामीण भागात दारूची अवैध विक्री सुरूच चंद्रपूर : मागील सहा वर्षांपासून बंद असलेली दारू सुरू करण्यात आली आहे. मात्र, ...
ग्रामीण भागात दारूची अवैध विक्री सुरूच
चंद्रपूर : मागील सहा वर्षांपासून बंद असलेली दारू सुरू करण्यात आली आहे. मात्र, तरीसुद्धा अनेकजण दारूची अवैध विक्री करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषत: ग्रामीण भागात अनेकजण दुचाकी किंवा चारचाकी वाहन घेऊन जातात. तिथेचे दारूची विक्री केली जाते. मात्र, याकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या व्यवसायात १८ वर्षांखालील मुलेही गुंतली आहेत. त्यामुळे पोलीस विभागाने कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे.
पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी
चंद्रपूर : मागील काही दिवसांत जिल्ह्यात कोरोनाने डोके वर काढले आहे. विविध सणाला सुरुवात झाल्याने बाजारपेठही गर्दीने फुलली आहे. मात्र, सद्य:स्थितीत अनेक ठिकाणचे कोरोना चाचणी केंद्र बंद झाले आहेत. त्यामुळे अनेकजण कोरोनाची चाचणी करण्यास जाऊन परत येत आहेत. ग्रामीण भागात हा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना चाचणी केंद्र पुन्हा सुरू करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.