मजिप्रा कर्मचाऱ्यांची सातवा वेतन लागू करण्याची मागणी;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:27 AM2021-05-24T04:27:21+5:302021-05-24T04:27:21+5:30
आंदोलनाचा इशारा : बल्लारपूर : बहुतेक सर्वच सार्वजनिक क्षेत्रात सातवा वेतन लागू करण्यात आला आहे. मात्र, जीवनावश्यक मूलभूत सेवा ...
आंदोलनाचा इशारा :
बल्लारपूर : बहुतेक सर्वच सार्वजनिक क्षेत्रात सातवा वेतन लागू करण्यात आला आहे. मात्र, जीवनावश्यक मूलभूत सेवा देणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना तो अजून लागू करण्यात आलेला नाही. मजीप्रातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करावा, अशी त्यांची मागणी असून, ही मागणी पूर्ण न झाल्यास १ जूनपासून काळ्या फिती लावून आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांची संघटना जलसेवा संघाने दिला आहे.
सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी सोबतच कोरोना काळात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५० लाख व २५ लाख रुपयांचे विमा कवच द्यावे, वेतन वृद्धीची थकीत रक्कम देण्यात यावी, आदी मागण्या आहेत. या मागण्यांचे निवेदन जलसेवा संघाने पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यासोबतच माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनाही निवेदन दिले आहे. आ. मुनगंटीवार यांनी या निवेदन पत्राची दखल घेऊन मजीप्रातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. निवेदन देताना जलसेवा महासंघाचे चंद्रपूर शाखेचे डी.जे. पंदीलवार, बबन काकडे, गजानन डबरे, नामदेव शास्त्रकार यांची उपस्थिती होती.
===Photopath===
230521\img-20210523-wa0006.jpg
===Caption===
मजिप्रा कर्मचाऱ्यांची सातवा वेतन लागू करण्याची मागणी
आंदोलनाचा इशारा