धान्यसाठ्यात वाढ करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:31 AM2021-04-28T04:31:01+5:302021-04-28T04:31:01+5:30
रस्त्यावरील साहित्याने रुग्णवाहिकाही निघेना चंद्रपूर : शहरातील बहुतांश रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवल्याने अपघाताची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे काम बंद आहे, ...
रस्त्यावरील साहित्याने रुग्णवाहिकाही निघेना
चंद्रपूर : शहरातील बहुतांश रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवल्याने अपघाताची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे काम बंद आहे, परंतु साहित्य रस्त्यावरच आहेत. कोरोना रुग्णांना रुग्णवाहिकेने नेण्यासाठी अडचण जात आहे. त्यामुळे रस्त्यावरील साहित्य हटवावे, अशी मागणी आहे.
पथदिव्यांची दुरुस्ती करावी
चंद्रपूर : बालाजी वार्ड, एकाेरी, समाधी वार्डामध्ये काही पथदिवे बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. अंधारामुळे रात्री बाहेर निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.
जुन्या इमारतींसाठी निधीची गरज
चंद्रपूर : शहरातील शासकीय जुन्या इमारतींची दुरुस्ती करून त्याची देखभाल करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. काही इमारती अतिशय जुन्या असल्याने धोका होण्याची शक्यता आहे.
कामाअभावी बेरोजगार संस्था अडचणीत
चंद्रपूर: बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी बेरोजगार संस्थाची निर्मिती करण्यात आली. मात्र, या संस्थांना कामच मिळत नाही. शासनाने या संस्थांना काम देण्याचे आश्वासन दिले. मात्र, या संस्थाना अद्यापही पाहिजे, तसे शासकीय कामच मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे संस्थाचालक अडचणीत आहेत.
गंजवार्डातील रस्त्याचे काम गतीने करावे
चंद्रपूर : येथील भाजी बाजार असलेल्या गंजवार्डातील रस्त्याचे सिमेंटीकरण केले जात आहे. मात्र, काम अतिशय संथगतीने सुरू असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लॉकडाऊन असल्याने रहदारी बंद आहे. त्यामुळे रस्त्याच्या या कामाला गती द्यावी, अशी मागणी आहे.
चहाच्या दुकानांत गर्दी
चंद्रपूर: मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरातील विविध चौकांमध्ये चहाचे मोठमोठे स्टाॅल लागले आहे. यामध्ये नागरिक चहा पिण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चंद्रपुरातील समाजमंदिर दुर्लक्षित
चंद्रपूर : शहरातील काही भागामध्ये समाजमंदिर बांधण्यात आले आहे. मात्र, याकडे संबंधितांचे दुर्लक्ष झाल्यामुळे सध्या येथे केरकचरा साचला आहे. त्यामुळे समाजमंदिराला महापालिकेने आपल्या अधिनस्त घेऊन विकास करावा, अशी मागणी केली जात आहे.
वीजबिलामुळे ग्राहक त्रस्त
चंद्रपूर : लाॅकडाऊनमध्ये अनेक ग्राहकांनी वीजबिल थकविले होते. दरम्यान, आता बिल भरण्यासंदर्भात महावितरणकडून वारावंर सूचना केल्या जात आहे. त्यामुळे बिल भरणे ग्राहकांना कठीण जात आहे. विशेष म्हणजे, राजकीय नेत्यांनी आश्वासन दिल्यामुळे अनेकांना बिल थकविल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शौचालयाअभावी नागरिकांना त्रास
चंद्रपूर : येथील संत कवरराम चौक, तसेच सिंधी काॅलनी परिसरात एकही सार्वजनिक शौचालय नसल्याने येथील व्यावसायिक, तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेने येथे सार्वजनिक शौचालय उभारावे, अशी मागणी केली जात आहे.
फायबर गतिरोधक बदलावे
चंद्रपूर : येथील हुतात्मा स्मारकाजवळील रस्त्यावर फायबर गतिरोधक लावण्यात आले आहे. मात्र, यातील काही तुटले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. येथे नव्याने फायबर गतिरोधक बसवावे, अशी मागणी केली जात आहे. लॉकडाऊनमुळे रहदारी कमी असल्याने काम केल्यास योग्य होईल.
दिशादर्शक बोर्ड तुटला
चंद्रपूर : लाखो रुपये खर्चून चंद्रपूर शहरातील विविध रस्त्यांवर मोठमोठे दिशादर्शक, गाव, तसेच अंतर असलेले बोर्ड लावण्यात आले आहे. मात्र, यातील अनेक बोर्ड तुटले असून, यामुळे बाहेरील नागरिकांना चुकीचा संदेश जात आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
नेटवर्कअभावी ग्राहकांची डोकेदुखी
चंद्रपूर : जिल्ह्यातील दुर्गम भागात विविध मोबाईले टॉवर संख्या कमीच आहे. त्यामुळे भ्रमणध्वनींना कव्हरेज मिळत नाही. बीएसएनएलचे जिल्ह्यात ग्राहक असून जास्तीत जास्त टॉवर उभारण्याची आवश्यकता आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून कव्हरेजची समस्या गंभीर बनली आहे. तालुक्याच्या ठिकाणी तरी टॉवरची निर्मिती करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.
मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक हैराण
चंद्रपूर : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. रात्री घराबाहेर निघणेही कठीण झाले आहे. शहरातील विविध वॉर्ड व मुख्य चौकात मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला आहे. दरम्यान, शहरात बरेच नागरिक श्वानांचे पालन करतात. त्यामुळे प्रतिबंधात्मक लस देण्याची मोहीम सुरू करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
नाम फलक नसल्याने प्रवाशी संभ्रमात
चंद्रपूर : जिल्ह्यातून अनेक राज्य महामार्ग, तालुका मार्ग, ग्रामीण मार्ग गेले आहेत. मात्र, यातील बहुतांश रस्त्यावर गावाच्या नावाचा फलक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असते. या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
गंजवार्ड परिसरातील रस्त्यावर दुर्गंधी
चंद्रपूर : येथील गंजवार्ड परिसरातील रामाळा तलावाशेजारी असलेल्या चौकामध्ये कचरा टाकत असल्याने रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. महानगरपालिकेने याकडे विशेष लक्ष देऊन नियमित कचरा साफ करावा, अशी मागणी होत आहे.
बाबूपेठ परिसरात कचऱ्याचे ढिगारे
चंद्रपूर : स्थानिक बाबूपेठ व नगिनाबाग परिसरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहेत. कोरोनामुळे प्रत्येक घरात स्वच्छता केली जात आहे. काही ठिकाणी कचराकुंड्या नसल्याने बरेच जण मोकळ्या जागेवर कचरा टाकतात. हा कचरा उचलण्यात आला नाही. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. शहरात डेंग्युसदृश्य रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.