‘त्या’ रस्त्याच्या बांधकामाच्या चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:18 AM2021-06-30T04:18:56+5:302021-06-30T04:18:56+5:30
भिसी : येथील जुनी ग्रामपंचायत ते बुद्धविहारापर्यंतच्या सिमेंट नाल्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याची ओरड नागरिकांकडून होत असून, त्या बांधकामाची ...
भिसी : येथील जुनी ग्रामपंचायत ते बुद्धविहारापर्यंतच्या सिमेंट नाल्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याची ओरड नागरिकांकडून होत असून, त्या बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
जुनी ग्रामपंचायत ते शनिवार पेठ बुद्धविहारापर्यंत आधी सिमेंट रस्ता बनविण्यात आला. त्यानंतर गत सहा महिन्यांपासून सिमेंट नालीचे बांधकाम सुरू आहे. या नाल्यावर सिमेंटची झाकणेसुद्धा लावण्यात येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दोन महिने नाली बांधकाम बंद होते. आता पावसाळा सुरू झाला तरी नाली बांधकाम अपूर्णच आहे. या बांधकामात साहित्य योग्य प्रमाणात न वापरल्यामुळे व पुरेशा प्रमाणात पाणी न टाकल्यामुळे नाली बांधकामाचा दर्जा निकृष्ट झाला आहे. तसेच ग्रामपंचायतीकडून पाण्याचा वापर करण्याची परवानगी न घेताच पाण्याचा उपसा सुरू आहे. त्याचा आर्थिक भुर्दंड ग्रामपंचायतीला बसणार आहे. त्यामुळे या बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.