धान पिकांचा विमा देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:34 AM2021-02-25T04:34:59+5:302021-02-25T04:34:59+5:30
सिंदेवाही : प्रधानमंत्री पीक विमा योजनेनुसार धान पीक खरीप हंगामासाठी सोसायटीमार्फत बँकेकडून कर्ज घेऊन कर्जाच्या रकमेतून पीक विम्याचे पैसे ...
सिंदेवाही : प्रधानमंत्री पीक विमा योजनेनुसार धान पीक खरीप हंगामासाठी सोसायटीमार्फत बँकेकडून कर्ज घेऊन कर्जाच्या रकमेतून पीक विम्याचे पैसे कपात करून हप्ता भरला. नैसर्गिक आपत्ती झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी विम्याचे कवच आहे. झालेल्या नुकसानीचा ४८ तासांत पंचनामा करून ३० दिवसांच्या आत नुकसानीचा विमा शेतकऱ्यांना द्यायचा, असे विमा योजनेत आहे. मात्र, नुकसान होऊनही शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला नाही.
हेक्टरी ८५० रुपये शेतकऱ्यांनी विम्याचे पैसे भरले असून हेक्टरी ४२ हजार ५०० रुपये विमा कंपनीने नुकसानीच्या प्रमाणात शेतकऱ्यांना द्यायला हवे. तीन महिने होऊन गेले असून विमा कंपनीने नुकसानीचे पैसे दिले नाही. त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री यांना शेतकरी शेतमजूर महासंघाच्या वतीने विम्याच्या हप्त्याचे पैसे त्वरित मिळावे, यासाठी तहसीलदार गणेश जगदाळे यांच्यामार्फत निवेदन दिले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष रघुनाथ शेंडे, कार्याध्यक्ष अरविंद जयस्वाल, चंद्रशेखर चन्ने, अशोक सागुदले, सुनील उटलवार, जगन्नाथ पाटील सोनवणे, जानिक वाघमारे, दिनकर बोरकर, यादव पाटील, अशोक तुमे, माधव आदे, विलास रामटेके, मयूर सूचक, लोकमित्र गेडाम, राजू ताडाम उपस्थित होते.