नवरगाव परिसरात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याची मजुरांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:52 AM2020-12-17T04:52:31+5:302020-12-17T04:52:31+5:30
आजही अनेक कुटुंबाचे आर्थिक कंबरडे मोडले असुन मार्च महिन्यांपासून लाॅकडाऊन सुरू झाले आणि जगण्याच्या अनेक मार्गावर निर्बंध लादल्या गेले. ...
आजही अनेक कुटुंबाचे आर्थिक कंबरडे मोडले असुन मार्च महिन्यांपासून लाॅकडाऊन सुरू झाले आणि जगण्याच्या अनेक मार्गावर निर्बंध लादल्या गेले. अनेकांचे हातातील कामे बंद झाली. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. अशाही परिस्थितीत स्वतःला सावरत जिवनाचा गाढा ओढणे सुरू असले तरी नवरगाव आणि परिसरातील गावांमध्ये कामाची कमतरता आहे. कामाच्या शोधात मजुरांची भटकंती सुरू आहे. त्यामुळे शासनाच्या आणि मजुरांच्या हक्कांची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने ची कामे सुरू करण्याची मागणी होत आहे.
तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत स्तरांवर कामाची निवड आणि कामाला मंजुरी मिळाली असून अनेक मजुरांनी कामासाठी नोंदणी आणि कामासाठी मागणी फार्म भरून ठेवली आहेत.त्यामुळे कामे सुरू न झाल्याने मजुरवर्गात आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
सिन्देवाही तालुक्यात एकुण ५१ ग्रामपंचायत आणि एक नगर पंचायत असुन एकाही ठिकाणी रोजगार हमी योजने ची कामे सुरू नाहीत. केवळ दहा- विस लोकांना रोजगार मिळेल अशी वृक्ष संवर्धन, घरकुल चे बांधकाम, गुरांच्या गोठ्याचे बांधकाम इत्यादी कामे सुरू आहेत.याव्यतिरिक्त एकही मोठे काम सुरू नाही. रोजगार हमी ची कामे सुरू झाल्यास मजुरांना कामासाठी भटकावे लागणार नाही.