जागेचे पट्टे देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:51 AM2021-03-13T04:51:23+5:302021-03-13T04:51:23+5:30
धूर फवारणी करण्याची मागणी चंद्रपूर : शहरात डासांची उत्पत्ती वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. ...
धूर फवारणी करण्याची मागणी
चंद्रपूर : शहरात डासांची उत्पत्ती वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. महापालिका प्रशासनाने डासांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
बेरोजगारांना रोजगार भत्ता द्यावा
चंद्रपूर: लॉकडाऊनंतर अनेकांनी गावचा रस्ता धरला आहे. मात्र आता हाताला काम नसल्याने त्यांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे काही तरुणांनी पुन्हा शहराची वाट धरली आहे. मात्र शहरातही काम मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत आहे. त्यामुळे भत्ता सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे .
फांद्यांमुळे वाढली अपघाताची शक्यता
चंद्रपूर : शहरातील विविध वाॅर्डातील रस्त्यावर असलेल्या झाडांच्या फांद्या वाढल्या आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. विशेषत: दुचाकी वाहनधारकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन फांद्या तोडाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे .
बंगाली कॅम्प बाजारात कचऱ्याचा ढीग
चंद्रपूर : येथील बंगाली कॅम्प भाजीबाजारामध्ये कचऱ्याच्या ढिगामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या बाजारात खरेदी करण्यासाठी परिसरातील अनेक नागरिक मोठ्या प्रमाणावर येतात. सध्या कोरोनाचे संकट असल्यामुळे नागरिकांची भीती अधिकच वाढली आहे.
जप्त वाहनांचा लिलाव करावा
चंद्रपूर : येथील शहर व रामनगर पोलीस ठाण्यात अनेक दुचाकी वाहने जप्त करून आणण्यात आली आहेत. मात्र वाहनमालकांनी ही वाहने अनेक वर्षांपासून नेलीच नाही. आता ती पोलीस ठाण्यात पडून आहेत. त्यातील अनेक वाहने भंगार झाली असून काहींचे सुटेभागही बेपत्ता झाले आहेत. या वाहनांचा लिलाव करून जागा रिकामी करावी, अशी मागणी केली जात आहे.
प्रोत्साहन योजनेचे अनुदान थकले
चंद्रपूर : आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी समाजकल्याण विभागातर्फे आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहन योजना शासनाकडून राबविली जाते. या योजनेंतर्गत जिल्ह्यात मागील तीन वर्षात सुमारे ६०० जोडप्यांनी अर्ज केला.
जात पडताळणीची प्रकरणे प्रलंबित
चंद्रपूर : चंद्रपुरातील जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षांकडे चंद्रपूरसह अन्य तीन जिल्ह्याचा प्रभार देण्यात आला. यासह संशोधन अधिकाऱ्यांकडेसुद्धा चंद्रपूर व गडचिरोली समाजकल्याण विभागाचा प्रभार असल्याने, मोठ्या प्रमाणात कामाचा ताण वाढला आहे. परिणामी जात पडताळणीची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत.
ऑटोचालक आर्थिक संकटात
चंद्रपूर : शहरामध्ये मोठ्या संख्येने ॲाटोचालक आहेत. मात्र कोरोनामुळे त्यांचा व्यवसाय डबघाईस आला आहे. त्यामुळे भविष्याची चिंता त्यांना सतावत आहे. सरकारने याकडे लक्ष देऊन प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहरातील रस्त्यावर जनावरांचा ठिय्या
चंद्रपूर : शहरातील काही रस्त्यावर रात्री जनावरांचा ठिय्या असतो. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.