शिक्षकांच्या अधिग्रहित सेवा मुक्त करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:20 AM2021-06-20T04:20:05+5:302021-06-20T04:20:05+5:30
चंद्रपूर : विदर्भात नव्या शैक्षणिक सत्राची सुरुवात २८ जूनपासून होत आहे. त्यामुळे कोविड १९ साठी अधिग्रहित केलेल्या शिक्षकांना सेवेतून ...
चंद्रपूर : विदर्भात नव्या शैक्षणिक सत्राची सुरुवात २८ जूनपासून होत आहे. त्यामुळे कोविड १९ साठी अधिग्रहित केलेल्या शिक्षकांना सेवेतून मुक्त करण्यात यावे, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सहकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले.
सन २०२१-२०२२ चे शैक्षणिक सत्र २८ जूनपासून सुरू होत आहे. त्यामुळे शिक्षकांना शाळेत जाणे अनिवार्य आहे. परंतु, बऱ्याच शिक्षकांची कोविड १९ मध्ये सेवा अधिग्रहित करण्यात आली आहे. आता शाळा सुरू होणार आहे. त्यामुळे शिक्षकांना कोविड १९ च्या सेवेतून मुक्त करावे, तसेच शिक्षकांचा उन्हाळी सुट्टीत कपात केलेला वाहतूक भत्ता अदा करण्यात यावा, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, कार्याध्यक्ष लक्ष्मणराव धोबे, कार्यवाह श्रीहरी शेंडे, कोषाध्यक्ष दिगांबर कुरेकर, संघटक मनोज वासाडे, रवींद्र बनपूरकर आदी उपस्थित होते.