छोट्या उपकालव्यांना पाणी सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 11:51 PM2017-09-02T23:51:05+5:302017-09-02T23:52:05+5:30
काही दिवसांपूर्वी गोसीखुर्दच्या उजव्या मुख्य कालव्याला पाणी सोडण्यात आले. परंतु, जी उपकालवे आहेत त्यात पाणी न सोडल्याने खरकाडा, रणमोचन, गांगलवाडी, चौगान व अन्य परिसरातील धान पिके धोक्यात येत असल्याने .....
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : काही दिवसांपूर्वी गोसीखुर्दच्या उजव्या मुख्य कालव्याला पाणी सोडण्यात आले. परंतु, जी उपकालवे आहेत त्यात पाणी न सोडल्याने खरकाडा, रणमोचन, गांगलवाडी, चौगान व अन्य परिसरातील धान पिके धोक्यात येत असल्याने उपकालव्यांना पाणी सोडण्यासाठी जि.प. सदस्य प्रमोद चिमूरकर व अन्य सरपंच, कार्यकर्ते यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांना निवेदन देण्यात आले आहे.
गोसखुर्दचे पाणी सध्या उजव्या मुख्य कालव्या लगतच्या शेतकºयांना मिळत आहेत. परंतु, जे शेत उजव्या कालव्यांपासून दूर आहेत. त्यांना पाण्याच्या सोयीसाठी उपकालवेसुद्धा निर्माण करण्यात आले आहे. ही उपकालवे ग्रामीण भागातील संजीवनी ठरणारे असूनसुद्धा कामे अपूर्ण व कच्चा स्वरूपात आहेत. उजव्या मुख्य कालव्याचे काम पूर्ण केल्यास हजारो हेक्टर शेतीला पाणी सहज मिळण्यास मदत होऊ शकते. त्यासाठी जी उपकालवे आहे, त्या परिस्थितीत पाणी सोडल्यास धान पिके करपण्यास बळी पडणार नाही, म्हणून पाणी सोडण्यासाठी गोसीखुर्दचे कार्यकारी अभियंता रोषण हटवार व उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांना परिसरातील शेतकºयांच्या समवेत शुक्रवारी निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी जि.प. सदस्य प्रमोद चिमूरकर, पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, उमेश धोटे, पायपाल पारधी, उषा भिवनकर, ईश्वर ठाकरे, नरेश सहारे, विनोद पाटील, मारोतराव तिवाडे, रवींद्र ढोरे, विवेकानंद थेरकर, दयानंद सहारे, सुरज ढोरे, मनिष गिरी व अमर गाडगे, प्रल्हाद भर्रे व अन्य गावकरी उपस्थित होते.