बोरगाव बुट्टी ते शिवरा रस्ता दुरुस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:29 AM2021-07-30T04:29:30+5:302021-07-30T04:29:30+5:30
शंकरपूर : बोरगाव बुट्टी ते सिरसपूर शिवरा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे शेतकऱ्यांना व शेतमजुरांना ...
शंकरपूर : बोरगाव बुट्टी ते सिरसपूर शिवरा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे शेतकऱ्यांना व शेतमजुरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता तत्काळ दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी आंबोली ग्रामपंचायतचे सदस्य व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे चिमूर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हा रस्ता शिवरा, सिरसपूर, आंबोली या गावाला जोडणारा आहे. या रस्त्याने जाणारे प्रवासी शेतकऱ्यांना व शेतमजुरांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. या रस्त्याने बोरगाव बुट्टी व शिवरा सिरसपूर येथील शेतकरी व शेतमजूर व अन्य प्रवासी जात असतात. मात्र या रस्त्याकडे स्थानिक प्रशासनाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. बोरगाव बुट्टी व सिरसपूर शिवरा रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, या आशयाचे निवेदन सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय चिमूर येथे देण्यात आले. यावेळी शुभम मंडपे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मधुकर नागपुरे, सत्यवान नगराळे, रोहित गेडाम, बोरगाव बुट्टी येथील शेतकरी शुभम वाघमारे व सुमित गायकवाड उपस्थित होते.