रस्त्याचे बांधकाम करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 11:43 PM2017-09-26T23:43:47+5:302017-09-26T23:44:00+5:30
चंद्रपूर महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर प्रभाग क्र. २ मधील नानाजी रत्नपारखी ते कारमेल अकाडमी ते भाऊराव रायपुरे यांच्या घरापर्यंत रस्त्याची दैनावस्था झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर प्रभाग क्र. २ मधील नानाजी रत्नपारखी ते कारमेल अकाडमी ते भाऊराव रायपुरे यांच्या घरापर्यंत रस्त्याची दैनावस्था झाली आहे. त्यामुळे मुलांना शाळेत जाणे कठीण झाले आहे. या रस्त्याचे बांधकाम त्वरित करण्यात यावे, अशी मागणी महापौर अंजली घोटेकर यांच्याकडे शिवसेना नगरसेवक सुरेश पचारे, जेष्ठ नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी महापौर अंजली घोटेकर यांनी सदर रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर करण्याचे आश्वासन दिले. सदर रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यावर जागोजागी खडडे पडले असल्याने खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे, असे चित्र आहे. शाळेत जाणाºया मुलांना या रस्त्याने जाताना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांच्या समस्येची दखल घेत वॉर्डातील जेष्ठ नागरिकांसह नगरसेवक सुरेश पचारे यांनी रस्ता बांधकाम करण्याची मागणी महापौर यांना निवेदनातून केली आहे. याची तत्काळ दखल घेण्याची मागणी आहे.