रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:30 AM2021-04-28T04:30:47+5:302021-04-28T04:30:47+5:30
सरकारी निवासस्थाने झाली दुर्लक्षित सिंदेवाही : शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने ...
सरकारी निवासस्थाने झाली दुर्लक्षित
सिंदेवाही : शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने निवासस्थाने बांधून दिलेली आहेत. मात्र, याचा उपयोग अपवादानेच केला जात आहे. त्यामुळे ही निवासस्थाने अशी दुर्लक्षित पडून आहेत.
जिवती तालुक्यातील समस्या सोडवा
जिवती : जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील अनेक समस्या आजही सुटलेल्या नाहीत. जिवती तालुक्याची स्थापना होऊन आता अनेक वर्षे झाली तरीही वीज, रस्ते, पाणी अशा मूलभूत सुविधाही येथे पुरेशा प्रमाणात पोहोचलेल्या नाहीत. या सुविधांअभावी येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गडचांदूर - जिवती मार्गावरील खड्डे बुजवा
जिवती : गडचांदूर - जिवती मार्गाची दुरवस्था झाली असून, अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. लॉकडाऊन असल्याने आता रस्त्यावरील रहदारी बंद आहे. त्यामुळे या मार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
रस्त्यावरील अंधार दूर करा
कोरपना : शहरातील वणी, आदिलाबाद, चंद्रपूर या तीन प्रमुख मार्गांवर पथदिवे नसल्याने परिसरात रात्रीच्या वेळेस अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे या मार्गावर पथदिवे लावण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावर पोलीस स्थानक, विश्रामगृह, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तालुका क्रीडा संकुल आदी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत.
भद्रावती तालुक्यात रानडुकरांचा हैदोस
भद्रावती : काही गावांच्या शिवारात जंगली प्राण्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हाती आलेल्या पिकांचे रानडुकरांमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देऊन जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.