तणसाची मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:21 AM2021-06-02T04:21:56+5:302021-06-02T04:21:56+5:30
फांद्या ठरत आहे धोकादायक चंद्रपूर : जिल्ह्यातील काही रस्त्यांवरील झाडांच्या फांद्या जीवघेण्या ठरत आहे. त्यामुळे या फांद्याची छाटणी करावी, ...
फांद्या ठरत आहे धोकादायक
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही रस्त्यांवरील झाडांच्या फांद्या जीवघेण्या ठरत आहे. त्यामुळे या फांद्याची छाटणी करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात आली. आता पावसाचे दिवस सुरू होणार आहे. त्यामुळे वेळीच फांद्या कापून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती करावी
चंद्रपूर : तालुक्याला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे पावसाळ्यापूर्वी लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर वाढला
चंद्रपूर : शहरात दिवसेंदिवस प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर वाढत आहे. बाजार परिसर व अन्य ठिकाणी गरज नसतानाही प्लॅस्टिक पिशव्या दिल्या जात आहेत. या पिशव्या कुठेही टाकून देण्यात येत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे.
पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी
चंद्रपूर : खासगी कंपन्या, महामंडळे, सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांना मागील अनेक वर्षांपासून अत्यल्प पेन्शन मिळत आहे. सध्या महागाई वाढली. त्यामुळे पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी केली जात आहे.