दुर्गापूर मार्गावर गतिरोधकाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:52 AM2021-02-06T04:52:39+5:302021-02-06T04:52:39+5:30
झुडपे ठरत आहेत जीवघेणे चंद्रपूर : ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेल्या झुडपांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. ...
झुडपे ठरत आहेत जीवघेणे
चंद्रपूर : ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेल्या झुडपांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. व्याहाड, अंतरगाव, मुडझा रस्ता, निफंद्रा, डोंगरगाव, बोरखळा, कसरगाव, करोली, निफंद्रा, मंगरमेंढा बारसागड, मेहा, गेवरा, पालेबारसा, विरखल चक, अंतरगाव आदी रस्त्यांवर दोन्ही बाजूला मोठी झुडपे वाढली आहेत. काही मार्गांवर अपघातही झाले.
वन्यप्राण्यांना हुसकवण्यासाठी फटाके
वरोरा : मागील काही दिवसांपासून शेत शिवारात वन्यप्राण्यांनी हैदोस सुरु केला आहे. वन्यप्राण्यांच्या दहशतीमुळे शेतातील कामास मजूर जाण्यास नकार देत आहे. कापूस वेचनी, गहू, हरभरा पिकांची मशागत करणे कठीण झाले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना हुसकविण्याकरिता शेत मालक शेतात दररोज फटाके फोडीत आहे. फटाके फोडल्यानंतरच मजूर कामास प्रारंभ करीत आहे.