आरमोरी-तळोधी बससेवा सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:30 AM2021-08-26T04:30:06+5:302021-08-26T04:30:06+5:30
यापूर्वी तळोधी बा. ते आरमोरी बसच्या दिवसातून चार ते पाच फेऱ्या होत होत्या. मात्र, गेल्या महिन्याभरापासून तळोधी ते गांगलवाडी ...
यापूर्वी तळोधी बा. ते आरमोरी बसच्या दिवसातून चार ते पाच फेऱ्या होत होत्या. मात्र, गेल्या महिन्याभरापासून तळोधी ते गांगलवाडी रोडचे काम अतिशय संथपणे चालू असून, या मार्गाने चारचाकी वाहनाची वाहतूक करणाऱ्या लोकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. मात्र, महिन्याभरापासून तळोधी ते आरमोरी बससेवा बंद असल्यामुळे तळोधी बा. येथील प्रवाशांना नागभीड-ब्रह्मपुरी मार्ग आरमोरी, गडचिरोलीकडे जावे लागते, तसेच गांगलवाडी, मेंडकी, बालापूर परिसरातील मुले, मुली, महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी नेहमी या बसने तळोधीला येत असतात. मात्र, बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या महिन्याभरात बससेवा बंद असल्याने परिवहन विभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. संबंधित विभागाने या मार्गाच्या दुरुस्तीकडे लक्ष देऊन, या मार्गाने बंद असलेली बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.