गडचांदूरातून प्रवासी रेल्वे सुरू करण्याची मागणी ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:34 AM2021-09-08T04:34:00+5:302021-09-08T04:34:00+5:30
यावेळी गडचांदूर येथून बल्लारपूरपर्यंत प्रवाशी रेल्वे सुरू करावी. बल्लारपूर येथून सुटणाऱ्या पॅसेंजर रेल्वे गडचांदूर येथून सोडाव्या. गडचांदूर-आदीलाबाद रेल्वे मार्गाचे ...
यावेळी गडचांदूर येथून बल्लारपूरपर्यंत प्रवाशी रेल्वे सुरू करावी. बल्लारपूर येथून सुटणाऱ्या पॅसेंजर रेल्वे गडचांदूर येथून सोडाव्या. गडचांदूर-आदीलाबाद रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करून पूर्ण करावे, अशा मागण्या गडचांदूर येथील शिष्टमंडळाने रेल्वेच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनातून करण्यात आल्या. गडचांदूर शहर व परिसरात सिमेंट उद्योग, कोळशाच्या खाणी असल्याने, महाराष्ट्र व इतर प्रांतातील नागरिक मोठ्या संख्येने वास्तव करीत आहेत. त्यांना स्वगृही जाण्यासाठी रेल्वे वाहतूक सोईस्कर होईल. सर्व उद्योगांना हे सोईस्कर होईल, याकडे लक्ष वेधले.
गडचांदूर, आदिलाबाद मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २०१०-११ मध्येच आर्थिक तरतूद करण्यात आली आहेत. मात्र, रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळे आजर्यंत या रेल्वे मार्गाचे काम सुरू झाले नाही. दक्षिण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे. त्यामुळे कामाला गती येईल, अशी अपेक्षा आहे. शिष्टमंडळामध्ये रमेश काकडे, रोहन काकडे, दीपक वरभे व इतरांचा समावेश होता.
070921\img-20210907-wa0180.jpg
निवेदन देतांना शिष्टमंडळ