सिग्नल सुरु करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:34 AM2021-08-18T04:34:14+5:302021-08-18T04:34:14+5:30
रस्त्याअभावी नागरिकांचे हाल चंद्रपूर : येथील तुळशीनगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा ...
रस्त्याअभावी नागरिकांचे हाल
चंद्रपूर : येथील तुळशीनगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन येथील रस्त्यांची दुरुस्ती करून दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अतिक्रमण काढावे
चंद्रपूर : बहुतांश गावाची शिव आणि ग्रामीण भागातील पांदण रस्ते आता अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यासंदर्भात तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पांदण रस्ते व गावाची शिव आता संकटात आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवून त्याठिकाणी पक्के रस्ते तयार करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पावसाचे दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांना या रस्त्यावरून जाताना त्रास सहन करावा लागतो.
कुत्र्यांच्या हैदोसाने नागरिक त्रस्त
चंद्रपूर : शहरात रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीने जात असताना हे मोकाट कुत्रे अचानक गाडीवर झेप घेतात. यामुळे अपघातही वाढले आहेत. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही शासकीय तथा खासगी शाळांना संरक्षण भिंत नाही. त्यामुळे भविष्यात अपघाताची शक्यता आहे. कोरोना संकटामुळे सध्या स्थितीत शाळा बंद आहे. मात्र शाळा सुरु झाल्यानंतर काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देवून संरक्षण भिंत बांधावी,अशी मागणी करण्यात आली आहे.
बंद पथदिव्यामुळे नागरिकांना त्रास
चंद्रपूर : शहरातील नागपूर रोड, ऊर्जानगर रोड परिसरातील काही पथदिवे तसेच इतरही काही ठिकाणचे पथदिवे रात्रीच्या वेळी बंद-चालू होत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे वाहनधारकांना दिसत नाहीत.