रोजगाराभिमुख ट्रेड सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2017 01:38 AM2017-06-29T01:38:35+5:302017-06-29T01:38:35+5:30

येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे विजतंत्री, जोडारी, वायरमन, वेल्डर, टर्नर, मशिनस्ट इत्यादी रोजगाराभिमूख ट्रेड सुरु करण्यात यावे,

Demand for starting a trade-oriented trade | रोजगाराभिमुख ट्रेड सुरू करण्याची मागणी

रोजगाराभिमुख ट्रेड सुरू करण्याची मागणी

Next

तहसीलदारांना निवेदन : विद्यार्थी मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे विजतंत्री, जोडारी, वायरमन, वेल्डर, टर्नर, मशिनस्ट इत्यादी रोजगाराभिमूख ट्रेड सुरु करण्यात यावे, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी सेना मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रतीक गोरघाटे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
भद्रावती तालुक्यातील लोकसंख्या एक लाखांहून अधिक आहे. शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेमधे कामचलावू प्रकारचे ट्रेड आहे. या ट्रेडच्या अभ्यासाने रोजगार मिळणे कठिण आहे. भद्रावती शहरामधे चार ते पाच खाजगी आयटीआय आहेत. येथे प्रवेश घेण्यासाठी ७० हजार ते एक लाखापर्यंत डोनेशन घेण्यात येते. त्यामुळे येथील ट्रेडचा गरीब विद्यार्थी लाभ घेवू शकत नाही. भद्रावती शहरातील व जवळपासच्या खेडेगांवातील विद्यार्थ्यांना या ट्रेडच्या अभ्यासाकरिता वरोरा व चंद्रपूर येथे जावे लागते, यात विद्यार्थ्यांना आर्थीक भुर्दंड होतो. म्हणून लोकसंख्येच्या आधारावर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधे विजतंत्री, जोडारी, वायरमन, वेल्डर, टर्नर, मशिनस्ट हे ट्रेड सुरु करण्यात यावे, अशी मागणी आहे. बहूजन रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Web Title: Demand for starting a trade-oriented trade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.