शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:31 AM2021-02-09T04:31:24+5:302021-02-09T04:31:24+5:30

नेटवर्कअभावी ग्राहक त्रस्त चंद्रपूर : जिल्ह्यातील काही गावात तसेच दुर्गम भागामध्ये विविध कंपन्यांसह बीएसएनएलचेसुद्धा नेटवर्क नाही. त्यामुळे ...

Demand for training of farmers | शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची मागणी

शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची मागणी

Next

नेटवर्कअभावी ग्राहक त्रस्त

चंद्रपूर : जिल्ह्यातील काही गावात तसेच दुर्गम भागामध्ये विविध कंपन्यांसह बीएसएनएलचेसुद्धा नेटवर्क नाही. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहे. त्यातच ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नेटवर्क समस्या सोडविण्याची मागणी केली जात आहे. परीक्षा तोंडावर आल्याने विद्यार्थी अभ्यासात गुंतले आहेत.

गावांना रस्त्याची प्रतीक्षा

वरोरा : तालुक्यातील अनेक गावांसाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याने नागरिकांना पायवाटेनेच ये-जा करावी लागते. अनेक गावात जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. अनेकदा रस्ते तयार करण्याची मागणी करण्यात आली. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

रब्बी हंगामामुळे गावातील कट्टे थंडावले

चंद्रपूर : सध्या शेतामध्ये कापूस वेचणी, सोयाबीन तसेच धान मळणीचे काम सुरू आहे. त्यामुळे गावातील पारावर तसेच चौकाचौकात बसून गप्पा करणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कट्टे ओस पडल्याचे दिसून येत आहेत.

अतिवृष्टीचा निधी मिळाला नाही

चंद्रपूर : शासनाने जाहीर केलेली अतिवृष्टीची मदत अद्यापही काही शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने शेतकरी पटवारी आणि तहसील कार्यालयात चकरा वाढल्या आहेत. काही दिवसात नुकसान भरपाई मिळेल, असे आश्वासन देऊन अधिकारी मोकळे होत आहे. मात्र शेतकऱ्यांना अद्यापही प्रतीक्षाच आहे.

दोन दिवसांपासून चंद्रपुरात थंडी वाढली

चंद्रपूर : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात थंडी जाणवू लागली आहे. त्यामुळे पहाटे फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. काही नागरिक मार्निंग वॉकसाठी शहराबाहेरील रस्त्यावर मोठ्या संख्येने बाहेर पडत आहे. तर ज्येष्ठांचे बाहेर फिरणे बंद आहे.

सुसज्ज बाजार

ओट्याची निर्मिती

कोरपना : शहरातील आठवडी बाजार परिसरात नवीन सुसज्ज बाजार ओट्यांची निर्मिती करण्यात आली आहे. परिणामी भाजी विक्रेत्यांना चांगली सोय निर्माण झाली आहे. तसेच बाजार करणे सुविधाजनक झाले आहे. नवीन ओट्यावर छत उभारण्यात आले असल्याने पाऊस व उन्हापासून बचाव होत असल्याची प्रतिक्रिया ग्राहक व्यक्त करीत आहेत. तसेच पावसाळ्यातील चिखलाचा त्रास कमी होणार आहे.

तंटामुक्त समित्यांना सक्रिय करा

चंद्रपूर : तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गावातील तंटे गावात सोडविण्यासाठी गावागावांत तंटामुक्त समितीची स्थापना केली. पूर्वी या समितीला चांगले दिवस होते. मात्र आता या समित्या थंड बस्त्यात आहे. दरम्यान, लाॅकडाऊनच्या काळात काही समित्यांनी चांगले काम केले आहे. आता पुन्हा या समित्यांना सक्रिय करण्याची मागणी केली जात आहे. निवडणुकीमुळे या समित्या थंडावल्या आहेत.

फायबर गतिरोधक काढावे

चंद्रपूर : अपघाताचा आळा घालण्यासाठी प्रशासनाने चंद्रपूर-नागपूर रोडवरील हुतात्मा स्मारक परिसरात फायबर गतिरोधक लावले आहे. मात्र ते अर्धेअधिक तुटले असून यामुळेच अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते काढून नव्याने दुसरे बसवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

नाल्यांच्या पात्रात झुडपे वाढली

चंद्रपूर : तुकूम ते ऊर्जानगर मार्गावरील नाला तसेच परिसरात मोठ्या प्रमाणावर झुडपे वाढली आहे. काही महिन्यांपूर्वी येथे वाघ दिसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या झुडपांची विल्हेवाट लावावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

वन्य प्राणी शहराच्या दिशेने

चंद्रपूर : वन्य प्राण्यांना जंगलात पाणी मिळत नसल्याने शहराकडे त्यांनी धाव घेतली आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांनी शहराकडे धाव घेत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: Demand for training of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.