पोलीस पाटलांच्या मागण्या धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:29 AM2021-09-25T04:29:46+5:302021-09-25T04:29:46+5:30
चंद्रपूर : पोलीस पाटील शांतता व सुव्यवस्था राखणारा महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, त्यांच्या अनेक समस्या शासनाकडे धूळखात आहे. या ...
चंद्रपूर : पोलीस पाटील शांतता व सुव्यवस्था राखणारा महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, त्यांच्या अनेक समस्या शासनाकडे धूळखात आहे. या सोडविण्यासाठी पोलीस पाटलांनी आता संघटित व्हावे, असे आवाहन पोलीस पाटील श्रमिक संघटनेची राज्य अध्यक्ष गंगाधर उगे यांनी केले आहे.
श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य महासचिव हरिदास घोरपडे, वर्धा जिल्हाध्यक्ष सचिन पालन, संजय जगनाडे, शंकर निरंजने आदी उपस्थित होते.
उगे म्हणाले, शासन निर्णयानुसार पदभरती हा बिंदुनामावलीप्रमाणे होत आहे. उच्चशिक्षित व्यक्तींना पोलीस पाटीलपदी संधी मिळत आहे. त्यांच्या शैक्षणिक क्षमतेनुसार मानधन मिळत नाही. कुटुंब चालविण्यास अडचणी येतात. त्यामुळे मानधनात वाढ करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. आयोजनासाठी संतोष श्रीरामे, वंदना रामटेके, संजय जगनाडे, एकनाथ बन्सोड, साहेबराव घुगूल, योगेश पेंदाम, पंडित ढोबे, देवानंद सोनकुसरे, विजय दाभेकर, संजय माकोडे, नरेंद्र डोर्लीकर, मनोज कामतवार, श्याम साखरकर, संचालन सचिन दुधे, आभार पुरुषोत्तम गावंडे यांनी मानले.