पत्रकारितेमुळे लोकशाही व्यवस्था बळकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 10:50 PM2018-01-08T22:50:06+5:302018-01-08T22:51:00+5:30
लोकशाहीच्या चार स्तंभापैकी पत्रकारिता एक महत्त्वाचा स्तंभ असून त्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे.
आॅनलाईन लोकमत
बल्लारपूर : लोकशाहीच्या चार स्तंभापैकी पत्रकारिता एक महत्त्वाचा स्तंभ असून त्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील घडामोडींचे दर्शन घडते. लोकशाही व्यवस्था पत्रकारितेमुळे दिवसेंदिवस बळकट होत आहे, असे प्रतिपादन राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी केले.
बल्लारपूर तालुका महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून श्री संत तुकाराम महाराज सभागृह, बालाजी वॉर्ड येथे बुधवारी साजरा करण्यात आला. यावेळी ते कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार व राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्माकर पांढरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व प्रख्यात नाट्य कलावंत प्रा. डॉ. जयश्री गावंडे (कापसे), सन्मित्र महिला बँकेच्या अध्यक्ष डॉ. रजनी हजारे, पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कर, कैलास नवघरे, प्रतिभा नवघरे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष देवेंद्र आर्य, संपर्क प्रमुख प्रशांत विघ्नेश्वर आदी उपस्थित होते.
दरम्यान राज्यस्तरावर रंगभरण स्पर्धेतील प्रथम विजेती नम्रता सरकार, अशोक तिवारी, आशिया खान यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत विघ्नेश्वर तर उपस्थिताचे आभार देवेंद्र आर्य यांनी मानले. यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते.
शिक्षकांचा शिक्षणरत्न व शिक्षणभूषण पुरस्काराने सन्मान
चित्रकलेच्या क्षेत्रात बल्लारपूर शहराचे नाव लौकिक केल्याबद्दल अंकिता नवघरे हिला सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह प्रदान करून पुरस्कृत करण्यात आले. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल शिक्षणरत्न पुरस्काराने शोभा लाकडे, सोनाली आमटे, मोहम्मद शरीफ, सारिका डोर्लीकर, विजय शिंदे, काजी यांना तर शिक्षणभूषण पुरस्काराने नजमा शेख, सुखमीत कौर, रजनी वाळके, प्रमोद वासेकर, सुनीता लेनगुरे यांना स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
बल्लारपुरात विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान
बल्लारपूर : बल्लारपूर येथील बल्लारपूर प्रेस असोसिएशनच्या वतीने पत्रकार दिनाचा कार्यक्रम स्थानिक विश्रामगृहात पार पडला. यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन कार्यक्रमाच्या सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी व चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद काकडे उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात आपल्या कर्तव्याने व कलेने ठसा उमटविणारे बंडू धोतरे (पर्यावरण), संजय वायकोर (शिल्पकला), गणेश रहिकवार (चित्रपट निर्मिती), अंकिता नवघरे (चित्रकला), रजिया हेमंत मानकर (शिक्षण क्षेत्र), सुभाष ताजने (राजकीय क्षेत्र), जयप्रकाश निर्मल (क्रीडा क्षेत्र), प्रशांत दोंतुलवार (सिनेट), दीपक धोपटे (सिनेट), रामदयाल निषाद व सुखपाल निषाद (शौर्य), साजिद कुरैशी (रुग्णसेवा) यांचा गौरव चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक वसंत खेडेकर यांनी केले. संचालन प्रा. योगेश खेडेकर यांनी तर उपस्थितांचे आभार भाऊसाहेब येगीनवार यांनी केले. अतिथींचे स्वागत वसंत खेडेकर, अजय दुबे, श्रीनिवास कुंदकुरी, अनिल पांडे, प्रा. योगेश खेडेकर, मंगेश बेले, अनिल देठे, नारदप्रसाद , संजय पोतदार यांनी केले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित झाले होते. यावेळी पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्व सत्कारमूर्र्तींनी आपले मनोगत व्यक्त केले.
ब्रह्मपुरीत कार्यक्रम
ब्रह्मपुरी : महाराष्ट्र पत्रकार संघ शाखा ब्रह्मपुरीच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. धनराज खानोरकर, विजय रामटेके, अरविंद चुनारकर, मालवी, सचिव गोवर्धन दोनाडकर, महेश पिलारे आदी उपस्थित होते. यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी त्यानंतर पाहुण्यांनी मार्गर्दन केले. मधुकर मेश्राम, प्रदीप बिजवे, चंद्रशेखर सातव, गुरुदेव अलोने, अनिल कांबळे, संजय बागडे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन गोवर्धन दोनाडकर तर उपस्थिताचे आभार महेश पिलारेने यांनी मानले.यावेळी परिसरातील पत्रकार उपस्थित होते.