दानवे यांच्या वक्तव्याचा चंद्रपूर, मूल, ब्रह्मपुरीत निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2017 12:29 AM2017-05-13T00:29:52+5:302017-05-13T00:29:52+5:30

शेतकऱ्यांचा अपमान करणारे वक्तव्य करून चर्चेत आलेले भारतीय जनता पक्षाने प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांचा चंद्रपूर, मूल, ब्रह्मपुरी येथे निषेध करण्यात आला.

Democrats protest Chandrapur, Rashtriya, Brahmaputra protest | दानवे यांच्या वक्तव्याचा चंद्रपूर, मूल, ब्रह्मपुरीत निषेध

दानवे यांच्या वक्तव्याचा चंद्रपूर, मूल, ब्रह्मपुरीत निषेध

Next

शेतकऱ्यांबाबत अपमानजनक वक्तव्य : काँग्रेसचे निवेदन सादर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शेतकऱ्यांचा अपमान करणारे वक्तव्य करून चर्चेत आलेले भारतीय जनता पक्षाने प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांचा चंद्रपूर, मूल, ब्रह्मपुरी येथे निषेध करण्यात आला. खा. दानवे यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करीत काँग्रेसने निवेदन सादर केले.
स्थानिक जटपुरा गेट येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ खा. दानवे यांनी शेतकऱ्यांविरोधात बेताल विधानाचा निषेध करण्यासाठी शहरातील अनेक नागरिक एकत्र आले होते. यावेळी महाराष्ट्रातील भाजप सरकार व केंद्रातील मोदी सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, माजी अध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर, माजी प्रदेश सचिव व नगरसेविका सुनीता लोढिया, नगरसेवक नीलेश खोब्रागडे, अनिल शिंदे, कामगार संघाचे अध्यक्ष विनोद संकत, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन कत्याल, रामू खांडरे, शालिनी भगत, मंगला मडावी, फारूक सिध्दीकी, शाम राजूरकर, बंडोपंत तातावार, सुरेश खापणे, गौतम चिकाटे, प्रमोद कावळे, राजेंद्र आत्राम, सुरेश टापरे, प्रमोद धांदरे, शेख रेहान, स्वप्निल येरणे, वंदना गेडाम आदी उपस्थिती होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

दानवे यांनी राजीनामा द्यावा
ब्रम्हपुरी : तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजप प्रदेक्षाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राजीनामा देण्याची मागणी निवेदन शुक्रवारी ब्रम्हपुरी उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष खेमराज तिडके, जि. प. सदस्य प्रा.राजेश कांबळे, जि. प.सदस्य प्रमोद चिमूरकर, जि. प.सद्यस्या पारधी पं. स. सदस्य थानेश्वर कायरकर, ब्रह्मपुरी नगरपरिषदेच्या उपाध्यक्षा रश्मीताई पेशने, काँग्रेस शहराध्यक्ष हितेंद्र (बाळू) राऊत, महिला तालुकाध्यक्षा मंगला लोंनबळे, ब्रह्मपुरी महिला शहराध्यक्षा प्रतिभा फुलझेले, युवका काँग्रेस शहराध्यक्ष नरेश सहारे, विलास विखार, डॉ.सतीश कावळे, दिवाकर मातेरे, जयंत पित्तलवर, मनोज कावळे, प्रमोद मोटघरे, मोहन बागडे, मुन्ना रामटेके, टिकले, ऋषीजी बागमरे, वामन निकुरे, संदीप बागमरे, राकेश पडोळे, ईश्वर ठाकरे, दिवाकर मंडपे, दादाजी ढोरे, मंगला टिकले, राजेश पारधी, नारायण मेश्राम आदी उपस्थित होते.

Web Title: Democrats protest Chandrapur, Rashtriya, Brahmaputra protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.