पूर्व परवानगी न घेताच केली विहीरीची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:26 AM2020-12-24T04:26:11+5:302020-12-24T04:26:11+5:30

पोंभूर्णा नगर पंचायत प्रशासनाने शहरातील पाच विहीरीसह सध्याच्या प्रभाग क्रमांक-३ मधील विहीर दुरूस्ती व सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात केली. या ...

Demolition of Kelly well without prior permission | पूर्व परवानगी न घेताच केली विहीरीची तोडफोड

पूर्व परवानगी न घेताच केली विहीरीची तोडफोड

googlenewsNext

पोंभूर्णा नगर पंचायत प्रशासनाने शहरातील पाच विहीरीसह सध्याच्या प्रभाग क्रमांक-३ मधील विहीर दुरूस्ती व सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात केली. या सर्व कामांची ई-निविदा काढण्यात आल्याचे ऐकीवात आहे. परंतु मुळचे सातारा तुकुम येथील प्रविण सुरेश चिचघरे यांनी हे काम बंद पाडले. प्रविण चिचघरे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ती विहीर त्यांच्या मालकीच्या जागेत असल्याची माहिती पुढे येत असून मौजा-पोंभूर्णा, तलाठी साजा क्रमांक-४ भुमापन क्रमांक १०६६ आराजी ०.२४ हेआर. असा त्या जागेचा तपशील आहे. मौजा-पोंभूर्णा तलाठी कार्यालयाने दिलेल्या सातबाराप्रमाणे त्या जागेत एक पक्की विहीर असून इतर अधिकारातील नोंदीत त्या विहिरीवर शेतकऱ्याचा कब्जा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कोणतीही पूर्व सुचना किंवा पूर्व परवानगी न घेता माझ्या मालकीच्या व माझ्या ताब्यात असलेल्या पक्क्या विहीरीची तोडफोड करून नगर पंचायत प्रशासनाने कसुर केला असल्याने मुख्याधिकारी व पदाधिकारी यांचेवर कारवाई करून न्याय देण्याची मागणी करणारी लेखी तक्रार पोलिसात दाखल केली आहे.

एवढ्यावरच न थांबता प्रविण चिचघरे यांनी नगर पंचायत प्रशासनाकडे माहितीचा अधिकार दाखल केला असून विहीरीचे सौंदर्यीकरण व बांधकाम करणे बाबत काढण्यात आलेली निविदा, जाहिरात, अंदाजपत्रक आणि त्या अनुषंगाने आलेल्या निविदा धारक व कंत्राटदाराची यादी, निविदा मंजूर झालेल्या कंत्राटदाराच्या कार्यारंभ आदेशाची झेराॅक्स प्रत, विहीरीचे सौंदर्यीकरण व प्लॅटफॉर्म बांधकाम करण्याबाबत नगर पंचायत ने घेतलेल्या ठरावाची प्रत, आणि कोण-कोणाच्या घराजवळील विहीरींचे सौंदर्यीकरण करावयाचे होते त्या सर्व विहिरीची यादी इत्यादी विस्तृत माहिती पुरविण्याची विनंती केली आहे.

Web Title: Demolition of Kelly well without prior permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.