जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 01:46 AM2018-01-24T01:46:10+5:302018-01-24T01:46:29+5:30

कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ भारीप बहुजन महासंघ, विदर्भ आझाद पार्टी, महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल विचार मंच, चंद्रपूर महाराष्ट्र लोकशाही आघाडी, सीपीआयसीपीएम प्रहार संघटना, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभ,

Demonstrate in front of the Collector Office | जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

Next
ठळक मुद्देविविध संघटनांचा सहभाग : भिडे, एकबोटेला अटक करा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ भारीप बहुजन महासंघ, विदर्भ आझाद पार्टी, महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल विचार मंच, चंद्रपूर महाराष्ट्र लोकशाही आघाडी, सीपीआयसीपीएम प्रहार संघटना, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभ, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, सभांजी ब्रिगेड इत्यादी संघटनांना घेवून धरणे आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलनात भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे, महासचिव धिरज बांबोडे, संघटक कपूरदास दुपारे, शहराध्यक्ष राजू कीर्तक, महासचिव रुपचंद निमगडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा लता साव, कल्पना अलोने, निशा ठेंगरे, तनुजा रायपूरे, युवक आघाडीचे रमेश ठेंगरे, जिल्हा महासचिव सुमित मेश्राम, रामजी जुनघरे, पी. डब्ल्यू. मेश्राम, कुशल मेश्राम, मधूकर वानखेडे, सुरज गावंडे जिल्हा उपाध्यक्ष, गोविंद मित्रा आदी सहभागी झाले होते.
अशा आहेत मागण्या
मनोहर भीडे व मिलींद एकबोटे यांना अटक करुन ३०२ चा गुन्हा दाखल करावा, दंगलीमध्ये झालेल्या मालमत्तेची व जाळफोळीची नुकसान भरपाई करावी, महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी झालेल्या तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावे.

Web Title: Demonstrate in front of the Collector Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.