विविध मागण्यांसाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कर्मचाऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:35 AM2021-02-25T04:35:28+5:302021-02-25T04:35:28+5:30
चंद्रपूर : जॉईंट फोरम ऑफ युनियन्स आणि असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने विविध मागण्यांसाठी येथील दि ...
चंद्रपूर : जॉईंट फोरम ऑफ युनियन्स आणि असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने विविध मागण्यांसाठी येथील दि ओरिएंटल इंशुरन्स कंपनी मंडल, कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत कार्यालयाबाहेर निदर्शने केली. यावेळी सरकार विरोधी घोषणाही दिल्या. एससीएसटी असोसिएशनच्या वतीने सहायक प्रबंधक विलास वैरागडे यांनी विमा कंपनी सहित सरकारी सार्वजनिक उपक्रमांचे खाजगीकरण व ७४ टक्के एफडीआय, नवीन पेंशन योजनेच्या सरकारी धोरणाची कर्मचाऱ्यांना जाणीव करुन दिली.
जनरल इन्शुरन्स कर्मचारी युनियनच्या विविध मागण्या आहे. यामध्ये वेतन पुनर्निधारण, एनपीएस ऐवजी सर्वांना जुनी पेंशन लागू करावी, बेसिक पेंशनचे अपडेशन, कुटुंब पेंशन १५ टक्क्यावरून ३० टक्के करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
आंदोलनात मंडल प्रबंधक धर्मपाल वानखेडे, सहाय्यक प्रबंधक विलास वैरागडे, वरिष्ठ सहायक नितीन रंभाड, वरिष्ठ सहायक संजीवनी कुबेर, सहायक वसंत कवाडघरे, सहायक राजू काळे, प्रकाश चौधरी आदींचा यावेळी समावेश होता.