आवाळपूर-नांदाफाटा परिसरात डेंग्यूचा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:32 AM2021-08-24T04:32:23+5:302021-08-24T04:32:23+5:30
कोरोनाचा प्रकोप कमी होत असतानाच आता डेंग्यूचा कहर वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिक धास्तावलेले आहेत. आवाळपूर, नांदा, बिबी परिसरात ...
कोरोनाचा प्रकोप कमी होत असतानाच आता डेंग्यूचा कहर वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिक धास्तावलेले आहेत. आवाळपूर, नांदा, बिबी परिसरात डेंग्यूबाधितांचे प्रमाण वाढत आहे. या परिसरात पाण्याची डबकी साचत असून, त्यामुळे डासांचे प्रमाण वाढलेले आहे. या भागात नियमित स्वच्छता होत नसल्याने, पावसाळ्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. या भागात स्वच्छता करण्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. हा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वीच आरोग्य विभागाने व ग्रामपंचायतीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. फवारणी, धुरळणी करावी, डेंग्यूचे प्रमाण वाढण्यापूर्वीच दाट वस्ती तसेच अस्वच्छता असलेल्या ठिकाणी धुरळणी, फवारणी करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याची गरज आहे, तरच हा आजार आटोक्यात येऊ शकतो, अन्यथा कोरोनानंतर नागरिकांना डेंग्यूचा सामना करावा लागेल.