इनरव्हिल क्लबतर्फे दंत सुरक्षा सेमिनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:26 AM2021-03-21T04:26:59+5:302021-03-21T04:26:59+5:30
चंद्रपूर : इनरव्हिल क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीने न्यू इंग्लिश हायस्कूल येथे दंत सुरक्षा सेमिनार व चित्रकला स्पर्धा नुकतीच ...
चंद्रपूर : इनरव्हिल क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीने न्यू इंग्लिश हायस्कूल येथे दंत सुरक्षा सेमिनार व चित्रकला स्पर्धा नुकतीच पार पडली. चित्रकला स्पर्धेत १२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रवीण घोडे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विद्या बांगडे, डिस्ट्रिक ॲडिटर रमा गर्ग, क्लबच्या अध्यक्ष कल्पना गुप्ता, उमा जैन आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. घोडे यांनी दिवसांतून दोन वेळा ब्रश करणे गरजेचे असल्याचे सांगितले. जर दातांची निगा चांगल्याप्रकारे राखली नाही, तर दातांमध्ये कीड निर्माण होवून दात दुखण्याची समस्या उद्भवू शकते. तसेच उतारवयात अडचणी सामोर जावे लागण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रकला स्पर्धेत विजेत्या ठरलेल्यांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले. यावेळी क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.