कर्जमाफीची रक्कम नवरात्रीपूर्वी जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:00 AM2017-09-12T00:00:37+5:302017-09-12T00:00:49+5:30

राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीची रक्कम नवरात्री पूर्वी शेतकºयांच्या खात्यामध्ये जमा करावी, ....

Deposit the loan amount before Navratri | कर्जमाफीची रक्कम नवरात्रीपूर्वी जमा करा

कर्जमाफीची रक्कम नवरात्रीपूर्वी जमा करा

Next
ठळक मुद्देशिवसेनेचे धरणे : जिल्हाधिकाºयांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीची रक्कम नवरात्री पूर्वी शेतकºयांच्या खात्यामध्ये जमा करावी, यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.
राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली, कर्जमाफीवर मोठमोठ्या घोषणा केल्या. मात्र जाहीर केलेल्या या कर्जमाफीची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकºयांचे हाल सुरू असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
त्यामुळे शिवसेनेने आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. आंदोलनादरम्यान संपर्क प्रमुख तथा आमदार बाळू धानोरकर यांनी, सरकारने नवरात्री पूर्वी शेतकºयांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली नाही तर या सरकारला बुद्धी यावी यासाठी सदबुद्धी यज्ञ केला जाईल, असे ते म्हणाले. शेतकरी हा दिवसभर शेतामध्ये राबत असतो आणि सरकारच्या आॅनलाईन कर्जमाफीच्या अर्जामुळे व नवनवीन नियमांमुळे सेतू मध्ये रात्र-रात्र काढून अर्ज भरत आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. जोपर्यंत शेतकºयांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार नाही, तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असे ते म्हणाले.
चंद्रपूर जिल्ह्यात १ लाख ९० हजार शेतकरी आहेत. त्यापैकी फक्त २६० शेतकºयांना १० हजार रुपयाची अग्रीम रक्कम देऊन शासनाने शेतकºयाची थट्टा केली आहे, असे शिवसेना विधानसभा प्रमुख किशोर जोरगेवार म्हणाले. कर्जमाफीवर राज्याचे मुख्यमंत्री म्हणत असतात अभ्यास चालू आहे. हा अभ्यास कधी पर्यंत चालू राहणार? अभ्यास असाच चालू असणार असेल तर शेतकºयांवर उपासमारीची वेळ येणार आहे, असेही ते म्हणाले.
चंद्रपूर शहर प्रमुख सुरेश पचारे यांनी आंदोलनाचे प्रास्ताविक केले. संचालन शिक्षकसेना जिल्हाध्यक्ष राजेश नायडू यांनी केले. यावेळी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात जिल्हाप्रमुख सतीश भिवगडे, संदीप गिºहे, भारती दुधानी, विजयालक्ष्मी रोगे, सिक्की यादव, माया पटले, नगरसेवक विशाल निंबाळकर, रवींद्र लोनगाडगे, मनोज पाल, कुसूम उदार, विलास डांगे, बबन उरकुडे, सतीश संकुलवार, भास्कर ताजने, सरीता कुडे, जीवन बुटले, यांच्यासह शिवसैनिक या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Deposit the loan amount before Navratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.