विमुक्त जाती, भटक्या जमाती समाजबांधवांची तहसील कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:34 AM2021-09-16T04:34:24+5:302021-09-16T04:34:24+5:30
पोंभुर्णा तालुक्यात भटक्या समाजातील लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे; परंतु स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही भटका समाज विकासापासून कोसो दूर आहे. ...
पोंभुर्णा तालुक्यात भटक्या समाजातील लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे; परंतु स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही भटका समाज विकासापासून कोसो दूर आहे. भटका समाज हा सामाजिक, आर्थिक, राजकीय सांस्कृतिकदृष्ट्या मागास आहे. या समाजाला स्मशानभूमीची जागासुद्धा उपलब्ध नाही. समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने कोणतीही उपाययोजना केली नाही. भारत देश शायनिंग होत असताना भटका समाज मात्र विकासापासून वंचित राहिलेला आहे. या समाजाचे प्रश्न सोडवून या समाजाला न्याय मिळवून देण्यात यावा, अशी मागणी तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
या आंदोलनात रणपती वडस्कर, राजू कस्तुरे, सुहास वाघाडे, अरविंद गद्देकार, जालिंदर सावंत, अनिल सोपनकार, सूरज राऊत, राकेश गद्देकार यांची उपस्थिती होती.
150921\img-20210914-wa0153.jpg
विमुक्त जाती, भटक्या जमाती समाजबांधवाची तहसील कार्यालयावर धडक