शिधापत्रिका नसणारे धान्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:27 AM2021-05-14T04:27:43+5:302021-05-14T04:27:43+5:30
चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शासनाने लाॅकडाऊन सुरू केला आहे. संकटात सापडलेले कुणीही उपाशी ...
चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शासनाने लाॅकडाऊन सुरू केला आहे. संकटात सापडलेले कुणीही उपाशी राहणार नाही, अशी घोषणा शासनाने केली. दरम्यान, अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंबांना मोफत धान्य दिले जात आहे. त्यातच पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचेही धान्य मोफत दिले जात आहे. मात्र ज्या गरीब कुटुंबीयांकडे शिधापत्रिका नाही. अशा कुटुंबीयांचे मोठे हाल होत आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन मोफत धान्याची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गेल्या एक ते दीड महिन्यापासून कोरोचा दहशत पसरली आहे. मात्र आजही काही नागरिकांकडे शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांना रेशन धान्यापासून वंचित राहावे लागत आहेत.
शहरात हातमजुरी करणारे अनेक कुटुंब आहेत. मोलमजुरी केल्याशिवाय त्यांची चूल पेटत नाही बऱ्याच कुटुंबांनी शिधापत्रिकेसाठी अर्ज केले तर काही कुटुंबांकडे कागदपत्रेच नाहीत. लॉकडाऊन झाल्याने अशा कुटुंबांचे सर्व मार्ग बंद झाले. सध्या सरकारी स्वस्त धान्य दुकानातून काहींना गहू व तांदूळ देण्यात येत आहे. रोजगाराच बंद झाल्याने कुटुंबांचे हाल सुरू आहेत. शिधापत्रिका नसल्याने सामाजिक संस्था व दानदात्यांकडे आशावादी नजरेने बघावे लागत आहे. त्यामुळे संकटग्रस्त कुटुंबांना धान्य पुरविण्याची मागणी शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांनी केली आहे.