‘ज्येष्ठ’ निराधार योजनेच्या अनुदानापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:24 AM2021-02-08T04:24:47+5:302021-02-08T04:24:47+5:30
चंद्रपूर : संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ज्येष्ठ लाभार्थ्यांना दरमहा अनुदान दिले जाते. मात्र, गेल्या काही महिन्यापासून लाभार्थ्यांना अनुदान मिळाले ...
चंद्रपूर : संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ज्येष्ठ लाभार्थ्यांना दरमहा अनुदान दिले जाते. मात्र, गेल्या काही महिन्यापासून लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नाही. त्यामुळे ज्येष्ठ लाभार्थ्यांच्या बँकेत चकरा सुरू आहेत. कोरोना संकटामुळे यावर्षी सर्वांचे अर्थचक्र बिघडले आहे. असे असतानाच ज्येष्ठांना मिळणारे मानधनही वेळेवर मिळत नसल्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
संजय गांधी निराधार योजनेंतर्गत गोरगरीब लाभार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये अनुदान दिले जाते. ज्यांना कुणीच नाही अशा ज्येष्ठ नागरिकांना जीवन जगताना अडचणी येऊ नये, यासाठी हे अनुदान आहे. मात्र, हे अनुदान त्यांना वेळेवर मिळत नाही. प्रति महिना येणारे हे अनुदान कधी तीन तर कधी चार महिन्यांनी मिळते. त्यामुळे ज्येष्ठ लाभार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.