सिलिंडर दरवाढीविरोधात वंचित महिला आघाडीचे ‘थाली बजाव’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 05:00 AM2021-09-18T05:00:00+5:302021-09-18T05:00:49+5:30
लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत, असे असतानाही सातत्याने दरवाढ होत असल्याने घर चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या विरोधात वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे थाली वाजवून महागाईचा निषेध करण्यात आला. मोदी सरकारने तत्काळ गॅस व इंधन दरवाढ कमी न केल्यास अजून मोठ्या स्वरूपात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र शासनाच्या गॅस, पेट्रोल, खाद्यतेल, जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीविरोधात वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाली बजाव आंदोलन करण्यात आले. यासंदर्भातील मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
दिवसेंदिवस गॅस व खाद्यतेलाच्या किंमतीत प्रचंड दरवाढ होत आहे. पेट्रोल-डिझिलचे दराने मोठा उच्चांक गाठला आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत, असे असतानाही सातत्याने दरवाढ होत असल्याने घर चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या विरोधात वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे थाली वाजवून महागाईचा निषेध करण्यात आला. मोदी सरकारने तत्काळ गॅस व इंधन दरवाढ कमी न केल्यास अजून मोठ्या स्वरूपात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीचा महानगर अध्यक्ष तनुजा रायपुरे, विदर्भ समन्वयक राजू झोडे, महासचिव मोनाली पाटील, उपाध्यक्ष सुलभा चांदेकर, लता साव, पौर्णिमा जुनघरे, पुष्पलता कोटांगले, करुणा जीवने, अविता उके, रमा मेश्राम, शहर महासचिव सुभाषचंद्र ढोलणे, शहर उपाध्यक्ष सुभाष थोरात, सुनीता तावाडे, वैशाली साव, इंदू डोंगरे, अनिता जोगे, रेखा ढाणके, सुनंदा भगत, लता मेश्राम, पुष्पा ठमके, जासुंदा गेडाम, विद्या टेंभरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.